सलमान खानचा 'सिकंदर' सुद्धा साऊथ सिनेमाचा रिमेक? अखेर दिग्दर्शकाने सोडलं मौन; म्हणाले-
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 12:43 IST2025-03-09T12:42:55+5:302025-03-09T12:43:09+5:30
'सिकंदर' सिनेमा हा ओरिजिनल आहे की रिमेक याविषयी दिग्दर्शकाने मौन सोडलंय

सलमान खानचा 'सिकंदर' सुद्धा साऊथ सिनेमाचा रिमेक? अखेर दिग्दर्शकाने सोडलं मौन; म्हणाले-
सलमान खानच्या (salman khan) आगामी 'सिकंदर' (sikandar) सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. या सिनेमात सलमान खानसोबतरश्मिका मंदानाही झळकणार आहे. ए. आर. मुरुगोदास यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. 'सिकंदर'च्या घोषणेपासूनच हा सिनेमा रिमेक असल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे चाहत्यांची चांगलीच निराशा झाली. अखेर या सर्व चर्चांवर स्वतः दिग्दर्शक ए. आर. मुरुगोदास यांनी मौन सोडलंय. काय म्हणाले?
'सिकंदर' रिमेक की ओरिजिनल?
ए. आर. मुरुगोदास यांनी 'सिकंदर' रिमेक आहे की ओरिजीनल याविषयी मौन सोडलंय. ए.आर.मुरुगोदास म्हणाले की, "हा सिनेमा संपूर्णतः एका ओरिजिनल कथेवर बनवला गेला आहे. या सिनेमातील प्रत्येक सीन ऑथेंटिक पद्धतीने डिझाईन करण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना एक नवीन आणि फ्रेश अनुभव मिळेल. हा सिनेमा रिमेक नाहीये. सिनेमाचं संगीत, अॅक्शन, इमोशनल सीन्स या प्रत्येक गोष्टी प्रेक्षकांना आवडतील याची आम्हाला खात्री आहे."
अशाप्रकारे 'सिकंदर' सिनेमा हा संपूर्णतः मूळ सिनेमा असणार आहे. सलमान सिनेमात संजय राजकोट या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदानासईश्रीची भूमिका साकारणार आहे तर अभिनेते सत्यराज मिनिस्टर प्रधानच्या भूमिकेत झळकणार आहेत. याशिवाय सिनेमात शर्मन जोशी, प्रतीक बब्बर हे कलाकारही झळकणार आहे. ए. आर. मुरुगोदास यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलंय तर साजिद नाडियादवाला यांनी निर्मिती केली आहे. २०२५ च्या ईदमध्ये म्हणजेच पुढील महिन्यात हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.