'छावा'च्या डरकाळी पुढे 'सिकंदर' डगमगला! ४६व्या दिवशीही विकीच्या सिनेमाची तगडी कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 17:25 IST2025-04-01T17:25:22+5:302025-04-01T17:25:53+5:30

Chhaava Vs Sikandar : सध्या बॉक्स ऑफिसवर सिकंदर सिनेमा आणि छावा सिनेमामध्ये टक्कर पाहायला मिळत आहे.

'Sikandar' falters after 'Chhaava' scare! Vicky's film still earns a lot on day 46 | 'छावा'च्या डरकाळी पुढे 'सिकंदर' डगमगला! ४६व्या दिवशीही विकीच्या सिनेमाची तगडी कमाई

'छावा'च्या डरकाळी पुढे 'सिकंदर' डगमगला! ४६व्या दिवशीही विकीच्या सिनेमाची तगडी कमाई

सलमान खान(Salman Khan)चा 'सिकंदर' (Sikandar Movie) रविवारी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आणि पहिल्या दिवशी सिकंदरने २६ कोटी रुपयांची कमाई केली. ईदमुळे सोमवारी दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने बंपर कमाई करण्याची तयारी सुरू आहे. पण या सगळ्यात ४५ दिवस बॉक्स ऑफिसवर घौडदौड करणाऱ्या 'छावा'(Chhaava Movie)ने पुन्हा एकदा चकीत केले आहे. पुन्हा एकदा छावाने करोडोंची कमाई केली आहे. वीकेंडच्या सुट्टीचा लाभ 'छावा' सिनेमाला मिळाला आहे. दुसरीकडे, मोहनलालच्या 'L2: Empuraan' ची स्थिती फारशी चांगली नाही. पहिल्या वीकेंडमध्ये या मल्याळम चित्रपटाच्या कमाईत नाममात्र वाढ झाली आहे. 

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा'चे ब्लॉकबस्टर यश हे थक्क करणारे आहे. विशेषत: रविवारी 'सिकंदर'सारख्या मोठ्या प्रदर्शनासमोरही ज्याप्रकारे नतमस्तक होण्यास नकार दिला, ते कौतुकास्पद आहे. विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना स्टारर 'छावा' 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला आहे. या चित्रपटाने ४५ दिवसांत देशात ५९३.४५ कोटी रुपयांचे कलेक्शन केला आहे. यापैकी १५.८५ कोटी रुपयांची कमाई तेलगू व्हर्जनमधून झाली आहे. तर हिंदी आवृत्तीतून ५७७.६० कोटी रुपयांचा व्यवसाय झाला.

'छावा'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन 
Sacnilk च्या मते, संभाजी महाराजांवर आधारित 'छावा' सिनेमाने रिलीजच्या ४५व्या दिवशी देशभरात १.१५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. 'सिकंदर' रिलीज झाल्यामुळे या चित्रपटाच्या शोची संख्या कमी झाली आहे. तरीही, रविवारी काही शोमध्ये प्रेक्षक ३५.३८% जागांवर दिसले. सोमवारी ईद साजरी होत असल्याने 'छावा'लाही त्याचा काहीसा फायदा झाला आहे. परदेशात 'छावा'ची स्थिती फारशी चांगली राहिलेली नाही. ४५ दिवसांत, छावाने विदेशात बॉक्स ऑफिसवर केवळ ९१.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर देशांतर्गत आणि परदेशी एकूण कमाईसह चित्रपटाचे एकूण जगभरातील कलेक्शन आता ७९८.१९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

Web Title: 'Sikandar' falters after 'Chhaava' scare! Vicky's film still earns a lot on day 46

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.