कियाराला ‘या’ नावाने हाक मारतो सिद्धार्थ मल्होत्रा; स्वत: केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 12:58 PM2023-11-21T12:58:03+5:302023-11-21T12:59:53+5:30

सिद्धार्थ आणि कियारा करिअरबरोबरच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत असतात.

Sidharth Malhotra Reveals What He Calls Kiara Advani Out Of Love On Koffee With Karan 8 | कियाराला ‘या’ नावाने हाक मारतो सिद्धार्थ मल्होत्रा; स्वत: केला खुलासा

कियाराला ‘या’ नावाने हाक मारतो सिद्धार्थ मल्होत्रा; स्वत: केला खुलासा

करण जोहरचा लोकप्रिय कार्यक्रम 'कॉफी विथ करण 8' नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमाच्या आगामी भागात बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा हजेरी लावणार आहेत. वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा दोघेही आघाडीचे बॉलिवूड अभिनेते आहेत. 

चित्रपट निर्मात्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या भागाचा प्रोमो शेअर केला आहे.  प्रोमोमध्ये वरुण आणि सिद्धार्थ हे करण जोहरसोबत मस्ती करताना आणि अनेक खुलासे करताना दिसत आहेत. पिंकविलाच्या वृत्तानुसार, सिद्धार्थने तो कियाराला कोणत्या नावाने हाक मारतो याबाबतचा खुलासा 'कॉफी विथ करण 8' मध्ये केला आहे.

 सिद्धार्थ मल्होत्रा ​​कियाराला तीन नावांनी हाक मारतो.  रॅपिड फायर राउंड दरम्यान जेव्हा करणने अभिनेत्याला विचारले की तू कियाराला कोणत्या नावांनी हाक मारतोस. यावर सिद्धार्थ म्हणतो, 'लव्ह, की आणि बी'. 

याशिवाय करण जोहरने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये वरुण आणि सिद्धार्थ व्यतिरिक्त जान्हवी कपूर, विकी कौशल, काजोल आणि राणी मुखर्जी आणि अजय देवगण दिसत आहेत. 'कॉफी विथ करण 8'च्या मंचावर आतापर्यंत दीपिका पादुकोण-रणवीर सिंह, सनी देओल-बॉबी देओल, सारा अली खान- अनन्या पांडे या जोड्यांनी हजेरी लावली आहे.  डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रेक्षक ‘कॉफी विथ करण’चे सगळे भाग पाहू शकतात.

Web Title: Sidharth Malhotra Reveals What He Calls Kiara Advani Out Of Love On Koffee With Karan 8

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.