Sid Kiara Wedding : कडक सुरक्षाव्यवस्थेत पार पडणार सिद्धार्थ कियाराचं लग्न, ईशा अंबानींमुळे सुरक्षेत वाढ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 18:02 IST2023-02-06T18:02:05+5:302023-02-06T18:02:21+5:30
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि किआरा अडवाणी उद्या ७ फेब्रुवारी रोजी जैसलमेर येथील भव्य सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत.

Sid Kiara Wedding : कडक सुरक्षाव्यवस्थेत पार पडणार सिद्धार्थ कियाराचं लग्न, ईशा अंबानींमुळे सुरक्षेत वाढ?
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि किआरा अडवाणी उद्या ७ फेब्रुवारी रोजी जैसलमेर येथील भव्य सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. सध्या विवाहस्थळी मेहंदी, संगीत या सोहळ्यांना सुरुवात झाली आहे. दोघांचेही कुटुंब, नातेवाईक आणि बॉलिवुडचे काही सेलिब्रिटी प्रत्यक्ष लग्नासाठी उपस्थित आहेत. मात्र या लग्नसोहळ्यात नेहमीपेक्षा जास्त कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. याचं कारणही तसंच आहे.
जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसबाहेर शस्त्रांसह सुरक्षारक्षक तैनात असणार आहेत. स्पेशल सिक्युरिटीही तैनात करण्यात आली आहे. याचं कारण आहे ते म्हणजे कियाराची बालपणीची मैत्रीण आणि मुकेश अंबानी यांची लेक ईशा अंबानी या विवाहसोहळ्यासाठी उपस्थित असणार आहे. ईशा कियाराची लहानपणीपासूनची खास मैत्रीण आहे. आपल्या बेस्ट फ्रेंडच्या लग्नासाठी ईशा जैसलमेरला पोहोचली आहे. यासाठीच कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
या बिग फॅट वेडिंगसाठी सूर्यगढ पॅलेसवरील लक्झरी व्हिला बुक करण्यात आहे. या व्हिलामध्ये तब्बल ८४ खोल्यांचं बुकिंग करण्यात आलं आहे. तर पाहुण्यांसाठी ७० गाड्याही बुक करण्यात आल्या आहेत. सूर्यगढ पॅलेसवरील एका दिवसाचं भाडं एक ते दोन कोटींच्या घरात आहे. उद्या ७ जानेवारीला सिड किआरा सात फेरे घेतील तर ८ जानेवारी रोजी रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे.