नो फोटो प्लीज! सिद्धार्थ मल्होत्राची पापाराझींना विनंती; म्हणाला, "फक्त आशीर्वाद द्या..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 11:28 IST2025-07-18T11:26:59+5:302025-07-18T11:28:12+5:30
बीटाऊनमध्ये 'नो फोटो पॉलिसी'!

नो फोटो प्लीज! सिद्धार्थ मल्होत्राची पापाराझींना विनंती; म्हणाला, "फक्त आशीर्वाद द्या..."
बॉलिवूडमधलं पॉवर कपल सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) आई बाबा झाले आहेत. कियाराने दोन दिवसांपूर्वी मुलीला जन्म दिला. यामुळे मल्होत्रा आणि अडवाणी कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. सिद्धार्थच्या आईने काही वर्षांपूर्वीच मला नात हवी अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांची ही इच्छा आता पूर्ण झाली आहे. सिद्धार्थ-कियारा लेकीच्या येण्याने खूप आनंदी आहेत. लेकीला सर्वांचा आशीर्वाद मिळावा म्हणून त्यांनी पापाराझींमध्येही मिठाई वाटली. तसंच इथून पुढे आता मुलीचे फोटो काढू नका अशी विनंतीही केली आहे.
सिद्धार्थ मल्होत्राने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. तो लिहितो,"तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेमासाठी आणि शुभेच्छांसाठी खूप खूप आभार. आमचं मन आनंदाने भरुन आलं आहे. आयुष्यात पालकत्व अनुभवण्याचा हा नवीन प्रवास सुरु करताना आम्हाला कुटुंब म्हणून प्रायव्हसी द्याल अशी आशा. हा खास काळ प्रायव्हेट राहिला तर आम्हाला खूप बरं वाटेल. त्यामुळे, नो फोटो प्लीज, फक्त आशीर्वाद द्या. धन्यवाद.- कियारा आणि सिद्धार्थ"
'एनडीटीव्ही' रिपोर्टनुसार, कियाराची डिलीव्हरी ऑगस्ट महिन्यात होणार होती. त्याआधीच तिने लेकीला जन्म दिला. आई आणि मुलगी दोघीही स्वस्थ आहेत. याआधीही अनुष्का-विराट, रणबीर-आलिया, राणी मुखर्जी या सेलिब्रिटींनी मुलांचे फोटो काढू नका अशी पापाराझींना विनंती केली आहे. राणी मुखर्जीच्या लेकीचा चेहरा तर आजपर्यंत सोशल मीडियावर समोर आलेला नाही. तर सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर करीनानेही तैमुर आणि जेहचे फोटो काढू नका अशी पापाराझींना विनंती केली. त्यामुळे सध्या बीटाऊनमध्ये 'नो फोटो पॉलिसी' सुरु झाली आहे.