लेकीचं इब्राहिमसोबत अफेअर? श्वेता तिवारीने सोडलं मौन; म्हणाली, "मला भीती वाटते..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 16:51 IST2024-08-12T16:50:12+5:302024-08-12T16:51:45+5:30
श्वेता तिवारीला लेकीची काळजी; म्हणाली, 'कोण जाणे किती...'

लेकीचं इब्राहिमसोबत अफेअर? श्वेता तिवारीने सोडलं मौन; म्हणाली, "मला भीती वाटते..."
अभिनेत्री श्वेता तिवारीची (Shweta Tiwari) लेक पलक तिवारी (Palak Tiwari) आणि सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. हे दोघंही स्टारकिड अनेकदा पार्टी, इव्हेंटसाठी एकत्र दिसतात. इतकंच नाही तर पलक इब्राहिम आणि त्याच्या आई, बहिणीसोबत गोवा ट्रीपवरही जाऊन आली. दरम्यान आता या सर्व चर्चावर श्वेता तिवारीने मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे.
गलाटा इंडियाला दिलेल्या मुलाखतीत श्वेता तिवारी म्हणाली, "पलक खूप स्ट्राँग मुलगी आहे. पण उद्याही ती तशीच असेल का कोणास ठाऊक. कोण जाणे एखादी कमेंट, एखादं आर्टिकल किंवा एखादी गोष्ट तिला कधी मनाला लागे ज्यामुळे तिचा आत्मविश्वास ढळेल सांगता येत नाही. मला हीच भीती आहे. ती सध्या लहान आहे. लोक विचार न करता काहीही लिहितात. प्रत्येक सेकंदाला एखाद्या मुलासोबत तिचं नाव जोडलं जातं. तिचं अफेअर आहे असं बोललं जातं. माझी मुलगी कधीपर्यंत हे सहन करेल मला कळत नाहीए."
श्वेता असंही म्हणाली की पलक या चर्चांची केवळ खिल्ली उडवते. पण कधी कधी या गोष्टी तिला हैराणही करतात. लोक तिच्या स्लीम फिगरवरुनही बरंच बोलतात तरी ती याचा तिच्यावर काहीही फरक पडू देत नाही. आधी तिला या सगळ्याचा फरक पडायचा मात्र आता तिला माहित आहे की अशा अनेक मुली आहेत ज्यांना तिच्यासारखं दिसायचं आहे. तिला माहित आहे की तिने हे मेहनतीने कमावलं आहे.
पलक श्वेता आणि राजा चौधरी यांची मुलगी आहे. 2007 साली श्वेता आणि राजा यांचा घटस्फोट झाला होता. पलक आजही तिच्या वडिलांच्या संपर्कात असते.