अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2'लाही आवाज देणार का? श्रेयस तळपदे म्हणाला, 'इच्छा तर आहे पण...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 16:33 IST2024-03-15T16:32:34+5:302024-03-15T16:33:07+5:30

श्रेयस तळपदे 'पुष्पा 2' साठी डबिंग करणार का?

shreyas talpade reveals he is willing to do dubbing for Allu Arjun s Pushpa 2 | अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2'लाही आवाज देणार का? श्रेयस तळपदे म्हणाला, 'इच्छा तर आहे पण...'

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2'लाही आवाज देणार का? श्रेयस तळपदे म्हणाला, 'इच्छा तर आहे पण...'

अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा' (Pushpa 2) सिनेमाने गेल्यावर्षी धुमाकूळ घातला होता. त्याची स्टाईल, सिनेमातील गाणी सगळंच प्रेक्षकांना आवडलं. आात 'पुष्पा 2' चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. याचवर्षी ऑगस्ट महिन्यात 'पुष्पा' सीक्वेल प्रदर्शित होणार आहे. 'पुष्पा'च्या हिंदी व्हर्जनसाठी श्रेयस तळपदेने (Shreyas Talpade) आवाज दिला होता. आता दुसऱ्या पार्टसाठीही श्रेयसच आवाज देणार का यावर त्याने उत्तर दिलं आहे.

श्रेयसला एका मुलाखतीत पुष्पा 2 बाबत विचारण्यात आले असता तो म्हणाला, "मला पुष्पा २ साठी आवाज द्यायची मनापासून इच्छा आहे. पण सध्या ते शूटिंग करत आहेत. मला वाटतं जेव्हा त्यांचं काम संपेल तेव्हा टेक्निकली आमचं काम सुरु होईल. मला परत यासाठी डबिंग करायचं आहे. पण मेकर्स आणि माझ्यात अद्याप अधिकृतरित्या बोलणं झालेलं नाही."

तो पुढे म्हणाला, "मला आशा आहे लवकरच माझं मेकर्स आणि निर्मात्यांशी बोलणं होईल. पुढील महिन्यात जेव्हा शूटिंग संपेल तेव्हा आमच्यात चर्चा सुरु होण्याची शक्यता आहे. मी या फिल्मचा भाग असावं असं जर मेकर्सला वाटलं तर मलाही आनंदच होईल. मात्र हा पूर्णपणे निर्मात्यांचा कॉल आहे."

अल्लू अर्जुनसाठी आवाज देण्याची प्रक्रिया एन्जॉय करतो का? यावर श्रेयस म्हणाला, "जोपर्यंत तुम्ही एन्जॉय करता तोवर सगळं ठीक आहे. पण जेव्हा तुम्ही याकडे काम म्हणून पाहता तेव्हा ते कठीण जातं. मला पुष्पा सिनेमा खूप आवडला. त्यामुळेच त्याच्यासाठी स्क्रीनवर डब करण्यात मला मजा आली. मी अल्लूला आजपर्यंत भेटलेलो नाही. पण मी त्याच्या सगळ्या मुलाखती पाहिल्या आहेत. मी पुष्पाच्या हिंदी आवाजात जीव ओतला आहे असं म्हणत त्याने माझे आभार मानले होते."

अल्लू अर्जुन सध्या विशाखापट्टणम येथे 'पुष्पा 2' चं शूट करत आहे. काही दिवसात शूट पूर्ण होणार आहे. रश्मिकानेही सिनेमाबद्दल सांगताना हा चित्रपट फार मोठ्या स्केलवर असणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.

Web Title: shreyas talpade reveals he is willing to do dubbing for Allu Arjun s Pushpa 2