Video: 'सैय्यारा'साठी आलेल्या तरुणाईच्या गर्दीत श्रद्धा कपूरही बॉयफ्रेंडसोबत दिसली, बघितला सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 16:02 IST2025-07-23T16:01:45+5:302025-07-23T16:02:28+5:30
श्रद्धा कपूरनेही बॉयफ्रेंडसोबत पाहिला 'सैय्यारा', बघा Video

Video: 'सैय्यारा'साठी आलेल्या तरुणाईच्या गर्दीत श्रद्धा कपूरही बॉयफ्रेंडसोबत दिसली, बघितला सिनेमा
अहान पांडे (Ahaan Panday) आणि अनीत पड्डा (Aneet Padda) या नवोदित कलाकारांच्या 'सैय्यारा' सिनेमाने थिएटर्समध्ये धुमाकूळ घातला आहे. अनेक तरुण तरुणींनी सिनेमा बघण्यासाठी गर्दी केली आहे. कोणी खूप भावुक झालेले दिसत आहेत, तर कोणी ढसाढसा रडत आहे तर कोणी अगदी हाताला आयव्ही लावलेल्या अवस्थेतही रुग्णालयातून थेट थिएटरमध्ये सिनेमा पाहायला आले आहेत. असे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान 'आशिकी गर्ल' श्रद्धा कपूरही (Shraddha Kapoor) बॉयफ्रेंड राहुल मोदीसह सिनेमा पाहण्यासाठी पोहोचली. त्यांचा थिएटरमधला व्हिडिओ व्हायरल होतोय.
'सैय्यारा'सिनेमाचे दिग्दर्शक मोहित सूरी आहेत. त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या 'आशिकी २'मधून श्रद्धा कपूर लोकप्रिय झाली होती. आशिकी व्हाईब्स देणारा 'सैय्यारा' पाहण्यासाठी श्रद्धाही पोहोचली. यामध्ये ती सीटवर बसलेली आहे आणि समोर स्क्रीनकडे पाहून भावुक झाली आहे. तर तिच्या बाजूलाच बॉयफ्रेंड राहुल मोदी बसला आहे. सिनेमा संपल्यानंतर श्रद्धा निघायला लागते तेव्हा तिच्या मागे राहुलची झलक दिसते. 'सैय्यारा'ची क्रेझ फक्त चाहत्यांमध्येच नाही तर बॉलिवूडमध्येही पसरली आहे.
श्रद्धा आणि राहुल गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेक इव्हेंट्समध्येही ते सोबत दिसले आहेत. श्रद्धा अनेकदा तिच्या पोस्टमधून राहुलची झलक दाखवत असते. आता दोघं सिनेमा पाहतानाही एकत्र दिसले आहेत.
काही दिवसांपूर्वीच श्रद्धाने 'सैय्यारा'साठी पोस्ट शेअर करत कौतुक केलं होतं. 'मुझे सैय्यारा से आशिकी हो गयी है' असं ती म्हणाली होती.