"हॉलिवूडच्या ऑफर्स नाकारल्या कारण...", श्रद्धा कपूरचा खुलासा; 'स्त्री २' च्या यशावर म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 14:42 IST2024-12-15T14:41:42+5:302024-12-15T14:42:04+5:30
श्रद्धा कपूर बॅक टू बॅक सिनेमांमध्ये दिसली नाही कारण...

"हॉलिवूडच्या ऑफर्स नाकारल्या कारण...", श्रद्धा कपूरचा खुलासा; 'स्त्री २' च्या यशावर म्हणाली...
अभिनेत्री श्रद्धा कपूरचा (Shraddha Kapoor) भाव सध्या वधारला आहे. 'स्त्री २' हा ब्लॉकबस्टर सिनेमामुळे ती पुन्हा प्रसिद्धीझोतात आली. श्रद्धा मोजक्याच सिनेमांमध्ये दिसते. खूप विचार करुन ती भूमिका निवडते. तसंच तिच्या आतापर्यंतच्या प्रत्येक भूमिकांमध्ये विविधता आहे. दरम्यान नुकतंच श्रद्धाला हॉलिवूड सिनेमांमध्ये दिसणार का याबाबत विचारण्यात आलं. यावेळी त्यावेळी तिने हॉलिवूडच्या ऑफर्स आल्या पण आपण नकार दिल्याचा खुलासा केला.
'आज तक'च्या इव्हेंटमध्ये श्रद्धा कपूर सहभागी झाली होती. यावेळी हॉलिवूडमध्ये काम करण्यासंदर्भातील प्रश्नावर ती म्हणाली, "खरं सांगायचं तर मला काही ऑफर्स आल्या होत्या. पण मला त्यात काहीच एक्सायटिंग वाटलं नाही. जसं हिंदी सिनेमांमध्ये काम करताना माझा अप्रोच आहे की जर मला काही एक्सायटिंग वाटलं नाही मग ती गोष्ट असो किंवा भूमिका तर मला करायचंच नाही. आणि सध्या भारतीय सिनेमाचा जो काळ सुरु आहे ना तो खूप एक्सायटिंग आहे. इतके ओटीटी प्लॅटफॉर्म्स आता आले आहेत. खूप विस्तार होत आहे. मला खरंच असं वाटतं की मला शाहरुख खानसारखं बनायचं आहे. आपल्या सिनेमांचं मार्केट तिकडे घेऊन जायचं आहे. आपले सिनेमे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावे अशी माझी इच्छा आहे."
स्त्री २ च्या यशावर श्रद्धा म्हणाली,"मला हा अंदाज होताच की स्त्री २ ब्लॉकबस्टर होणार. मला तशी खात्रीच होती. म्हणूनत मी इतक्या आत्मविश्वासाने कोणताही दुसरा सिनेमा साईन केला नाही. बॅक टू बॅक सिनेमे करायचे असा माझा विचारच नव्हता. साधारणपणे असं होतं की लोकांना वाटतं की लाईन अप असावं, बॅक टू बॅक सिनेमांमध्ये दिसावं. पण मी स्त्री २ बाबतीत इतकी कॉन्फिडंट होते की मला तेव्हा फक्त स्त्री २ च करायचा होता."
नुकतंच श्रद्धाने सौदीमध्ये झालेल्या रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली. यावेळी तिची भेट 'स्पायडरमॅन' फेम अँड्र्यू गार्फिल्डसोबत झाली होती. त्यांचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. स्त्री आणि स्पायडरमॅनची भेट सोशल मीडियावर तुफान चर्चेत होती.