मराठमोळ्या श्रद्धा कपूरने पुन्हा रचला रेकॉर्ड, PM मोदींनंतर आता प्रियंका चोप्रालाही टाकलं मागे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2024 17:27 IST2024-08-25T17:27:11+5:302024-08-25T17:27:30+5:30
आता श्रद्धाने आणखी एक रेकॉर्ड रचला आहे. तिने थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) आणि 'देसी गर्ल' प्रियंका चोप्रला मागे टाकलं आहे.

मराठमोळ्या श्रद्धा कपूरने पुन्हा रचला रेकॉर्ड, PM मोदींनंतर आता प्रियंका चोप्रालाही टाकलं मागे!
Shraddha Kapoor : अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) चा 'स्त्री 2' ('Stree 2) हा चित्रपट धमाका करताना दिसतोय. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रमी रेकॉर्ड्स मोडले आहेत. आता श्रद्धाने आणखी एक रेकॉर्ड रचला आहे. तिने थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) आणि 'देसी गर्ल' प्रियंका चोप्रला मागे टाकलं आहे. श्रद्धा कपूर सोशल मीडिया स्टार बनली आहे.
भारतात इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोव्हर्स विराट कोहली (Cricketer Virat Kohli) याचे आहेत. 270 मिलियन नेटकरी विराटला इन्स्टाग्रामवर फॉलो करतात. भारतामधील इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा हा आकडा सर्वाधिक आहे. तर विराटनंतर श्रद्धा ही लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींमध्ये थेट दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. तिनं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रियंका चोप्रा यांनाही मागे टाकलं आहे.
भारतात विराटनंतर प्रियंका चोप्रा आणि त्यानंतर नरेंद्र मोदी हे तिसऱ्या क्रमांकावर होते. पण, प्रियंका चोप्रा आणि पंतप्रधान मोदी यांची फॉलोअर्स लिस्ट क्रॉस करत इंस्टाग्रामवरील प्रसिद्ध लोकांच्या लिस्टमध्ये श्रद्धाने दुसरे स्थान पटकावले आहे. श्रद्धाचे आता इन्स्टाग्रामवर तब्बल 92.1 मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. तर प्रियंकाचे 91.8 मिलियन फॉलोअर्स आहे. तर तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 91.3 फॉलोअर्स आहेत. हे आकडे 25 ऑगस्ट पर्यंतचे आहेत.
श्रद्धा ही बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये एक आहे. कोल्हापूरचे मराठी संस्कार जपत, कपूरांच्या घरची ही मराठमोळी लेक तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. तिच्यातील हा साधेपणा सुद्धा चाहत्यांना मोहून टाकत असतो. विशेष बाब म्हणजे, ती शुद्ध मराठीत बोलते. अनेक ठिकाणी ती आवर्जुन मराठीतच संवाद साधताना दिसून येते. श्रद्धाचे चाहते जगभरात आहेत, ती कुठेही गेली तरी ती तिच्या चाहत्यांना नक्कीच भेट देते.