किती गोड जोडी! श्रद्धा कपूरची बॉयफ्रेंडसोबत लग्नसोहळ्याला हजेरी, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 14:40 IST2025-02-28T14:39:58+5:302025-02-28T14:40:58+5:30

काही वर्षांपासून श्रद्धा आणि राहुल मोदी एकमेकांना डेट करत आहेत.

shraddha kapoor attends wedding function with boyfriend rahul mody video viral | किती गोड जोडी! श्रद्धा कपूरची बॉयफ्रेंडसोबत लग्नसोहळ्याला हजेरी, व्हिडिओ व्हायरल

किती गोड जोडी! श्रद्धा कपूरची बॉयफ्रेंडसोबत लग्नसोहळ्याला हजेरी, व्हिडिओ व्हायरल

सर्वांची लाडकी अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) ३७ वर्षांची आहे. अद्याप तिने लग्न केलेलं नाही. श्रद्धा लेखक राहुल मोदीला (Rahul Mody) डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. मात्र श्रद्धाने कधीच अशी अधिकृत घोषणा केलेली नाही. काही महिन्यांपूर्वी श्रद्धा आणि राहुलचं ब्रेकअप झाल्याचीही चर्चा होती.  पण आता दोघं पुन्हा सोबत दिसले आहेत. विमानात प्रवास करतानाचा त्यांचा फोटो व्हायरल झालाच होता. तर आता एका लग्नातील दोघांचा फोटो व्हायरल झाला आहे.

श्रद्धा आणि राहुल मोदी यांनी अहमदाबाद येथे एका लग्ना सोहळ्याला हजेरी लावली.  या लग्नातील आतला व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत. श्रद्धा शिमरी क्रीम रंगाच्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहे. यावर तिने मॅचिंग दागिने घातले आहेत. ती न्यूली वेड कपलचं अभिनंदन करण्यासाठी जाताना दिसत आहे. तर तिच्यासोबत राहुल मोदीही उभा आहे. सूट बूटात तोही हँडसम दिसत आहे. श्रद्धा नवरीची गळाभेट घेते, तिच्या पालकांना भेटते आणि नंतर फोटोसाठी पोज देते. श्रद्धाच्या एका फॅन पेजवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. 

श्रद्धा आणि रणबीर कपूरचा 'तू झूठी मै मक्कार' सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाचं लेखन राहुल मोदीनेच केलं होतं. तेव्हापासून दोघांचं अफेअर चालू असल्याच्या चर्चा होत्या. मध्यंतरी श्रद्धाने राहुलला अनफॉलो केल्याने त्यांच्या ब्रेकअपच्याही चर्चा झाल्या. तर आता ते पुन्हा सोबत दिसले असल्याने चाहते खूश आहेत. श्रद्धा आणि राहुल लग्न कधी करणार अशीही चाहत्यांकडून विचारणा होत आहे. 

श्रद्धा कपूरने 'स्त्री 2' ब्लॉकबस्टर सिनेमा दिला. तर ती यापुढील फ्रँचायझीमध्येही दिसणार आहेच. शिवाय 'सनम तेरी कसम 2' साठी तिला विचारणा झाली असल्याचं कळतंय. मात्र अद्याप याबाबत अधिकृत माहिती आलेली नाही.

Web Title: shraddha kapoor attends wedding function with boyfriend rahul mody video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.