छोटे केस अन् साधेपणा; अध्यात्माचा मार्ग स्वीकारल्यानंतर समंथाचा बदलला लूक, व्हिडीओ पाहून चाहते थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 18:06 IST2023-07-25T18:05:50+5:302023-07-25T18:06:11+5:30
Samantha Ruth Prabhu: समंथाने प्रकृतीच्या कारणास्तव काही काळासाठी कलाविश्वातून ब्रेक घेतला आहे. सध्या ती कोयम्बटूरमध्ये मेडिटेशन सेशन करत आहे.

छोटे केस अन् साधेपणा; अध्यात्माचा मार्ग स्वीकारल्यानंतर समंथाचा बदलला लूक, व्हिडीओ पाहून चाहते थक्क
दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे समंथा रुथ प्रभू. (Samantha Ruth Prabhu). दमदार अभिनयशैली आणि सौंदर्यामुळे चर्चेत येणारी समंथा पुन्हा एकदा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच समंथाने सिनेसृष्टीपासून काही काळ दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. 'सिटाडेल इंडिया'नंतर ती रुपेरी पडद्यावर दिसणार नसल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नाही तर वयाच्या ३६ व्या वर्षी तिने झगमगत्या दुनियेचा त्याग करत आध्यात्माचा मार्ग स्वीकारल्याचंही म्हटलं जात आहे. या चर्चांमध्येच आता तिचे काही नवीन फोटो समोर आले आहेत. जे पाहून चाहते थक्क झाले आहेत.
समंथाने प्रकृतीच्या कारणास्तव काही काळासाठी कलाविश्वातून ब्रेक घेतला आहे. त्यामुळे सध्या ती अध्यात्माच्या मार्गाकडे वळली आहे. यामध्येच सोशल मीडियावर तिचा एक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात तिचा लूक पूर्णपणे बदलल्याचं दिसून येत आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या समंथाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिचा नवा लूक दिसून येत आहे. तिचा हा लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत. या फोटोमध्ये समंथाने तिचे केस कापले असून ते शॉर्ट केले आहेत. इतकंच नाही तर यात ती कमालीची वेगळी दिसत आहे.
दरम्यान, समंथाने साऊथसह बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. गेल्या काही काळापासून समंथाची प्रकृती स्थिर नसल्यामुळे तिने काही काळासाठी कामातून ब्रेक घेतला आहे. सध्या ती कोयम्बटूरमध्ये मेडिटेशन सेशन करत आहे. समंथा लवकरच अभिनेता विजय देवरकोंडा याच्यासोबत 'खुशी' या सिनेमात झळकणार आहे.