"अंधविश्वास म्हणा पण..."; शिर्डीला येऊन साईबाबांचं दर्शन घेतल्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 17:53 IST2025-04-19T17:52:42+5:302025-04-19T17:53:08+5:30

शिल्पा शेट्टीने शिर्डीतील साईबाबा मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यावर तिच्या मनातील खास भावना व्यक्त केल्या (shilpa shetty)

shilpa Shetty say after coming to Shirdi and having darshan of Sai Baba | "अंधविश्वास म्हणा पण..."; शिर्डीला येऊन साईबाबांचं दर्शन घेतल्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली?

"अंधविश्वास म्हणा पण..."; शिर्डीला येऊन साईबाबांचं दर्शन घेतल्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली?

शिल्पा शेट्टी (shilpa shetty) ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री.  शिल्पाला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. शिल्पा शेट्टी तिच्या चाहत्यांना फिटनेसचे धडे देत असते. शिल्पा सध्या कोणत्याही सिनेमात इतकी काम करताना दिसत नसली तरीही ती सोशल मीडियावर सक्रीय आहे. शिल्पाने नुकतंच शिर्डीतील साईबाबा मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी शिल्पाने साईबाबा आणि तिचं काय कनेक्शन आहे, याविषयी मत व्यक्त केलं.

शिल्पाने मीडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "विशेष काही नाही पण वर्षातून एकदा मी इथे आवर्जुन येते.साईबाबांचं बोलावणं यावेळी खूप वेळानंतर आलंय. मी माझ्या संपूर्ण कुटुंबासोबत इथे आली आहे, याचा मला आनंद आहे. जेव्हा मी इथे येते तेव्हा मला वाटतं मी पुन्हा घरी आली आहे. मी आज जे काही आहे,  कारण साईबाबांचा माझ्या डोक्यावर आशीर्वाद आहे. साईबाबांकडून जी शिकवण मिळाली त्या गोष्टींना फिलॉसॉफीप्रमाणे मानत मी आयुष्य जगतेय. यापुढेही जगेल. फक्त श्रद्धा आणि सबूरी ठेवा. जे तुमच्या मनाप्रमाणे घडेल ते चांगलं, नाही घडलं तरीही चांगलं. फक्त बाबांवर विश्वास ठेवा की, ते जे काही करतील चांगल्यासाठी करतील."


"राणी माझा अत्यंत आवडता रंग आहे. मी जेव्हा इथे येते तेव्हा साईबाबांसाठी तयार होऊन होते. आम्ही आज थकून आलोय कारण आम्ही मुंबईतील शनी-शिंगणापूरमधून आलोय. खूप मोठा प्रवास केलाय. पण बाबा शक्ती देतात. माझी आईही इतक्या दूर प्रवास करुन आली आहे, ही फार मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. पैशांच्या पलीकडे खूप गोष्टी त्यांनी आहेत. मुख्य म्हणजे सुख-शांती-समाधान बाबांनी दिलंय. याविषयी अंधविश्वास आहे की दृढविश्वास नाही,  माहित नाही परंतु जे होतं ते चांगल्यासाठी होतं, यावर माझं ठाम मत आहे. शेवटी सर्व चांगलंच होतं, यावर माझा विश्वास आहे." अशाप्रकारे शिल्पाने तिचं मत व्यक्त केलंय.

Web Title: shilpa Shetty say after coming to Shirdi and having darshan of Sai Baba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.