जान्हवी कपूरच्या डान्सवर फिदा झाला शिखर पहाडिया, पोस्ट करत म्हणाला, "अप्सरा हो तुम..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 16:57 IST2024-09-06T16:56:37+5:302024-09-06T16:57:12+5:30
जान्हवी आणि शिखरचं नातं आता काही लपून राहिलेलं नाही.

जान्हवी कपूरच्या डान्सवर फिदा झाला शिखर पहाडिया, पोस्ट करत म्हणाला, "अप्सरा हो तुम..."
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरला (Janhvi Kapoor) सध्या साऊथ सिनेमाची लॉटरी लागली आहे. सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरसोबत (Jr NTR) ती 'देवरा पार्ट 2' मध्ये दिसणार आहे. जान्हवी आणि ज्युनिअर एनटीआरचं सिनेमातील एक गाणं नुकतंच रिलीज झालं. यामध्ये त्यांचा डान्स चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. जान्हवी अगदी साऊथ स्टाईल हिरोईनसारखीच दिसत आहे. जान्हवीच्या डान्सवर तिच्या बॉयफ्रेंडची प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.
'देवरा पार्ट 2' मधलं 'दावुदी' हे गाणं रिलीज झालं आहे. गाण्यातील ज्युनिअर एनटीआर आणि जान्हवीची केमिस्ट्री पाहून प्रेक्षक फिदा झालेत. गाण्याची कोरिओग्राफीही खूपच हटके आहे. दोघांचे हावभाव आणि मूव्ह्ज पाहून कोणीही जागेवरुन उठून नाचायला लागेल असे आहेत. आता यावर जान्हवीचा कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडियाची (Shikhar Pahariya) रिअॅक्शन समोर आली आहे. शिखरने इन्स्टाग्राम स्टोरीवर जान्हवीच्याया डान्सचा व्हिडिओ शेअर करत लिहिले,'वॉव, अप्सरा हो तुम या कोई परी'.
जान्हवी आणि शिखरचं नातं आता काही लपून राहिलेलं नाही. शिखरची ही कमेंट पाहून तर आता हे स्पष्टच झालं आहे. शिखरची ही रिअॅक्शन खूप व्हायरल होत आहे. २७ डिसेंबर रोजी 'देवरा पार्ट 2' रिलीज होणार आहे. सिनेमात सैफ अली खान खलनायकाच्या भूमिकेत आहे.