शहनाज गिलची बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री; पहिल्याच चित्रपटासाठी घेतलं प्रचंड मानधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 18:33 IST2022-04-29T18:28:01+5:302022-04-29T18:33:44+5:30
Shehnaaz gill: पंजाबी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यास शहनाज सज्ज झाली आहे.

शहनाज गिलची बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री; पहिल्याच चित्रपटासाठी घेतलं प्रचंड मानधन
पंजाबची कटरिना कैफ ते बिग बॉसमधील लोकप्रिय स्पर्धक असा प्रवास करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शहनाज गिल. आपल्या मस्तीखोर स्वभावामुळे आणि सौंदर्यामुळे शहनाजने चाहत्यांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं. त्यामुळेच आज शहनाज गिलचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. पंजाबी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यास शहनाज सज्ज झाली आहे. लवकरच ती अभिनेता सलमान खानच्या आगामी चित्रपटात काम करणार असून या चित्रपटासाठी तिने मोठी रक्कम आकारल्याचं सांगण्यात येत आहे.
भाईजानच्या 'कभी ईद कभी दिवाली' या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून शहनाज बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या चित्रपटाची सहनिर्मिती सलमान खान करत असून त्याने स्वत: शहनाजला या चित्रपटाची ऑफर दिली.
पहिल्या बॉलिवूड चित्रपटासाठी शहनाज घेणार इतकं मानधन?
सूत्रांच्या माहितीनुसार, शहनाजने अद्यापही या चित्रपटाविषयी वा तिच्या भूमिकेविषयी कोणतंही भाष्य केलं नाही. परंतु, ती या चित्रपटात अभिनेता आयुष शर्मासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. इतंकच नाही तर या चित्रपटासाठी शहनाजने मोठी रक्कम मागितल्याचं सांगण्यात येतं.
या चित्रपटासाठी शहनाज म्हणेल ती रक्कम देण्यास प्रोड्युसर तयार आहेत. मात्र, शहनाजने अद्यापही तिचं मानधन सांगितलेलं नाही. सध्या शहनाज अनेक नवनवीन प्रोजेक्टससाठी काम करत आहे. यात 'कभी ईद कभी दिवाली'सह ती एका पंजाबी चित्रपटातही झळकणार आहे.