Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 08:56 IST2025-06-28T08:54:33+5:302025-06-28T08:56:25+5:30

Shefali Jariwala Death Reason: ४२ वर्षीय शेफाली जरीवाला हिचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र याबाबत मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे तिच्या मृत्यूच्या कारणाबाबत अस्पष्टता निर्माण झाली आहे.  

Shefali Jariwala Death Update: What exactly caused Shefali Jariwala's death? Suspicion increased due to information given by Mumbai Police | Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला

Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला

Shefali Jariwala Death: कांटा लगा... या गीतावर केलेल्या अप्रतिम नृत्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवाला हिचा शुक्रवारी रात्री आकस्मिक मृत्यू झाला. ४२ वर्षीय शेफाली जरीवाला हिचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र याबाबत मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे तिच्या मृत्यूच्या कारणाबाबत अस्पष्टता निर्माण झाली आहे.  

शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,''शेफाली जरीवाला हिचा मृतदेह अंधेरी परिसरात असलेल्या तिच्या घरी सापडला होता. याबाबत रात्री एकच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सदर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयामध्ये पाठवला आहे. तसेच तिच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही’’.

शेफाली जरीवाला हिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाल्याचे सुरुवातीला सांगण्यात येत होते. मात्र मुंबई पोलिसांनी दिलेल्या या माहितीमुळे शेफाली जरीवाला हिचा मृत्यू नेमका कशामुळे याबाबतचा संभ्रम वाढला आहे. आता शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतरच तिच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होणार आहे.

शेफाली जरीवाला हिने  तिच्या अप्रतिम अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती. २००२ मध्ये तिचे 'कांटा लगा' गाणे प्रसिद्ध झाले होते. या गाण्यातील नृत्याने तिला रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवले होते. याशिवाय, तिने अनेक मालिकांमध्येही तिने अभिनय केला होता.  

Web Title: Shefali Jariwala Death Update: What exactly caused Shefali Jariwala's death? Suspicion increased due to information given by Mumbai Police