शनाया कपूरला बॉयफ्रेंडकडून मिळालेला धोका, म्हणाली, "त्याच्या मोबाईलमध्ये तीन-चार मुलींचे..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 11:09 IST2026-02-13T11:08:15+5:302026-02-13T11:09:45+5:30
परदेशात शनाया कपूरसोबत घडलं असं काही की...

शनाया कपूरला बॉयफ्रेंडकडून मिळालेला धोका, म्हणाली, "त्याच्या मोबाईलमध्ये तीन-चार मुलींचे..."
अभिनेता संजय कपूरची लेक स्टारकिड अभिनेत्री शनाया कपूर आगामी 'तू या मै' सिनेमात दिसणार आहे. शनायाने 'आँखो की गुस्ताखिया' सिनेमातून पदार्पण केलं होतं. यात तिची जोडी विक्रांत मेस्सीसोबत जमली होती. तर आता 'तू या मै'मध्ये ती आदर्श गौरवसोबत दिसणार आहे. व्हॅलेंटाईन डेच्या मुहुर्तावर आज हा रोमँटिक सस्पेन्स थ्रिलर सिनेमा रिलीज झाला आहे. व्हॅलेंटाईन डे निमित्त शनायाने तिच्या आयुष्यातील प्रेमाबद्दल खुलासा केला.
शनाया कपूर 'रिलेशनशिप अॅडव्हाइस'शोमध्ये आली होती. तिथे तिने एक्स बॉयफ्रेंडबद्दल खुलासा केला. ती परदेशात सुट्टीसाठी गेली असता तिथेच तिने बॉयफ्रेंडला रंगेहात पकडलं होतं. ती म्हणाली, "मी त्याच्यासोबत परदेशात होते. आमचं किती छान रिलेशनशिप आहे असंच मला वाटत होतं. एक दिवस मी डिनरसाठी जात असताना माझ्या बॉयफ्रेंडने त्याच्या मोबाईलवरुन कॅब बुक करायला सांगितलं आणि तो अंघोळीला गेला. मी कॅब बुक करण्यासाठी त्याचा मोबाईल घेतला तेव्हा मला धक्काच बसला. मोबाईल अनलॉक करताच नोटिफिकेशन आलं. त्याच्या एक्स गर्लफ्रेंडचं नाव मला दिसलं. मी चॅट ओपन केलं आणि एकानंतर एका पाच मुलींसोबतचं चॅट समोर आलं. तो सगळ्यांशी असं बोलत होता जसा काय तो सिंगल आहे."
ती पुढे म्हणाली, "मला काहीच समजत नव्हतं. मी लगेच स्क्रीनशॉट्स घेऊन माझ्या मैत्रिणींना पाठवले. आता मी काय करु? असं विचारलं. तेव्हा अनन्या पांडे म्हणाली, 'ट्रेन पकडून सरळ माझ्याकडे ये.' कारण अनन्याही आमच्यासोबत परदेशात होती. मी विचार केला मी आता ट्रेन तर पकडू शकत नाही. मी तीन दिवस सगळं नॉर्मल असल्याचं भासवत होते कारण एक तर आपण देशाबाहेर आहोत हे मला कळत होतं. माझ्याकडे दुसरा मार्ग नव्हता. शेवटी माझ्या एक्सला संशय आला आणि त्याने महागडे इअररिंग्स विकत घेऊन मला मनवण्याचा प्रयत्न केला. त्याला जाब विचारला असता त्याचं म्हणणं होतं की यात काय मोठी गोष्ट आहे. हे फक्त चॅटिंग होतं फिजिकल काहीच नव्हतं. मी म्हणाले, 'हे इमोशनल चीटिंग आहे जे फिजिकलपेक्षाही वाईट आहे. जा पळ हे गिल्टी इअररिंग्स आहेत का? मी वेड्यासारखी ओरडले पण मी ते इअररिंग्स आजही माझ्याकडे आहेत आणि मी ते अजूनही वापरते. मी ते कमावले आहेत आणि ते माझेच आहेत.'