Shakeela Teaser: शकीलाच्या भूमिकेत धमाका करणार ऋचा, पंकज त्रिपाठीही देणार हटके साथ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 15:54 IST2020-12-09T15:51:27+5:302020-12-09T15:54:18+5:30
शकीला सिनेमाच्या टीजरला काही तासातच २७ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. सोबतच लोक ऋचाच्या यातील बोल्ड अवताराचं कौतुकही करत आहेत.

Shakeela Teaser: शकीलाच्या भूमिकेत धमाका करणार ऋचा, पंकज त्रिपाठीही देणार हटके साथ...
Shakeela Teaser: बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चड्ढा आणि पंकज त्रिपाठी यांच्या आगामी 'शकीला' सिनेमाचा टीजर रिलीज झाला आहे. हा सिनेमा ख्रिसमसला रूपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून ऋचा ९० च्या दशकावर आपली जादू चालवणारी साउथ सायरन शकीलाला परफेक्ट श्रद्धांजली देत आहे. शकीला सिनेमाच्या टीजरला काही तासातच २७ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. सोबतच लोक ऋचाच्या यातील बोल्ड अवताराचं कौतुकही करत आहेत.
'शकीला' सिनेमाबाबत बोलताना ऋचा म्हणाली की, 'मला आनंद आहे की हा सिनेमा रिलीज होतो आहे. मला आशा आहे की, हा सिनेमा लोकांच्या जीवनात हसू आणि मनोरंजन आणेल तसेच हे निराशाजनक वर्ष आनंदाने समाप्त होईल. शकीलाची कथा इतर कथापेक्षा वेगळी आहे आणि विश्वव्यापी आहे. शकीलाने इंडस्ट्रीवर अनेक वर्ष आपला दबदबा कायम ठेवला होता. संकट काळात तिने सिनेमा व्यवसायाला बळ दिलं. पंकजीसोबत काम करणं फार चांगलं वाटलं'.
शकीला ही एका मुस्लिम परिवारातील मुलगी असूनही १६ वयाची असताना सिने उद्योगात प्रवेश केला आणि ती प्रत्येक फ्रेममध्ये तिची छाप सोडत होती. तिचा हा प्रवास आता रूपेरी पडद्यावर धमाका करण्यासाठी सज्ज आहे. यात ऋचा चड्ढासोबतच पंकज त्रिपाठी आणि मल्याळम अभिनेता राजीव पिल्लईही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. २५ डिसेंबरला रिलीज होणारा सिनेमा सॅमीस मॅजिक सिनेमा मोशल पिक्चरच्या बॅनरखाली तयार झाला आहे.