Shahrukh Khan: 'पठाण'चा पहिल्याच दिवशी 'शतके'पार झेंडा, कमाईचा आकडा रेकॉर्डब्रेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2023 22:44 IST2023-01-26T22:31:41+5:302023-01-26T22:44:48+5:30
Shahrukh Khan: पठाणने हिंदी चित्रपटाच्या ओपनींग कमाईचा जगातील रेकॉर्ड मोडला आहे

Shahrukh Khan: 'पठाण'चा पहिल्याच दिवशी 'शतके'पार झेंडा, कमाईचा आकडा रेकॉर्डब्रेक
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान(Shahrukh Khan)च्या 'पठाण' (Pathaan) या चित्रपटाने जबरदस्त क्रेझ आणि विरोधादरम्यान पहिल्याच दिवशी कमाईचे विक्रम मोडीत काढले आहेत. दुपारपर्यंत, चित्रपटाने पीव्हीआर आयनॉक्स आणि सिनेपोलिसमध्ये एकूण २०.३५ कोटी रुपयांची कमाई केली होती. इतर मल्टिप्लेक्स साखळींमध्येही सिनेमा प्रचंड कमाई करत आहे. तब्बल ४ वर्षांनंतर कमबॅक करत असलेल्या शाहरुखच्या पठाणने कमाईचे आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. पठाणची पहिल्या दिवसातील वर्ल्डवाईड कमाई शकतेपार गेली असून तब्बल १०६ कोटींची कमाई पहिल्याच दिवशी झाली आहे.
पठाणने हिंदी चित्रपटाच्या ओपनींग कमाईचा जगातील रेकॉर्ड मोडला आहे. त्यामुळे, पठाणच्या वनडे कमाईने नवीन रेकॉर्ड स्थापित केला आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी वर्ल्डवाईड १०६ कोटींची कमाई केली असून भारतातील कमाई ५७ कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे दुसऱ्याच दिवशी प्रजासत्ताक दिन असल्याने दुसऱ्यादिवशीही मोठी कमाई झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. बॉलिवूड समिक्षक तरण आदर्श यांनी ट्विटरवरुन शाहरुखच्या पठाण सिनेमाने केलेल्या कमाईची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामध्ये, त्यांनी वरील सर्व माहिती दिली.
दरम्यान, बॉक्स ऑफिसच्या आकडेवारीनुसार चित्रपटाने दुसऱ्या दिवशीपर्यंत वर्ल्डवाईड १६० ते १७५ कोटींची कमाई केल्याचा अंदाज आहे. दुसऱ्या दिवशी भारतात या चित्रपटाने ५६ ते ६० कोटींची कमाई केल्याचा अंदाज आहे. त्यामुळे, केवळ दोनच दिवसांत चित्रपटाने भारतातील कमाईतच शंभर कोटींचा बिझनेस केला आहे. दरम्यान, पठाण चित्रपटाला विरोध झाल्यामुळे समर्थनही तितक्याच ताकदीने मिळालं आहे. चाहत्यांनी किंग खानला अक्षरश: डोक्यावर घेतलं असून चित्रपटगृहात प्रेक्षकांचा मोठा जोर दिसून येत आहे.