"...तर तेव्हा प्रेक्षकांनी सिनेमा स्विकारला असता", शाहरुख खान 'रा.वन'च्या अपयशाबद्दल पहिल्यांदाच बोलला! सीक्वलबाबत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 14:31 IST2025-11-04T14:24:47+5:302025-11-04T14:31:33+5:30
१४ वर्षानंतर शाहरुखच्या 'रा.वन'चा सीक्वल येणार?अभिनेत्याने स्पष्टच सांगितलं

"...तर तेव्हा प्रेक्षकांनी सिनेमा स्विकारला असता", शाहरुख खान 'रा.वन'च्या अपयशाबद्दल पहिल्यांदाच बोलला! सीक्वलबाबत म्हणाला...
Shahrukh Khan: हिंदी चित्रपटसृष्टीत बॉलिवूड का बादशहा, किंग ऑफ बॉलिवूड, किंग खान या उपाधिंनी ओळखला जाणारा, हजारो तरुणींच्या गळयातील ताईत असणारा, रोमांस, ड्रामा, कॉमेडी, अॅक्शन या सर्व प्रकारच्याभूमिका लिलया हाताळणारा सुपरस्टार म्हणजे शाहरुख खान. शाहरुखची कारकिर्द टेलिव्हिजनपासून सुरु झाली. चित्रपटातील त्याची कारकिर्द सुरु झाली ती दिवाना या चित्रपटापासून.शाहरुखने आजवर इंडस्ट्रीला एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. त्यानंतर 'डर' मधील वेडसर असणाऱ्या प्रेमीपासून ते 'बाजीगर' मधील आकर्षक खलनायकापर्यंत शाहरुखने धाडसीपणे वैविध्यपूर्ण भूमिकांची निवड केली. मात्र, २०११ साली आलेल्या 'रा.वन' या चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली. नुकतीच या चित्रपटासंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
'रा.वन' हा शाहरुखच्या करिअरमधील एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट होता. या चित्रपटासाठी दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी देखील प्रचंड मेहनत घेतली. मात्र, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपटाला फारसं यश मिळालं नाही. अशातच या चित्रपटाच्या सीक्वलबद्दल किंग खानने हिंट दिली आहे. अलिकडेच एका इव्हेंटमध्ये शाहरुख म्हणाला, "हो, जर अनुभवने याबद्दल विचार केला तर सीक्वल येऊ शकतो. कारण, मला वाटत चित्रपट त्यानेच बनवला होता आणि आता सीक्वली तोच बनवू शकतो. आम्ही त्यावर खूप मेहनत घेतली आणि देवाची इच्छा असेल तर योग्य वेळ आली तर दुसरा भागही येऊ शकतो. आता तर या गोष्टी सहज शक्य आहेत.
रा.वन चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यामधील व्हिजूअल इफेक्ट्स, अॅक्शन सीक्वेन्स, दिग्दर्शन आणि अभिनयाचं खूप कौतुक झालं, परंतु चित्रपट प्रेक्षकांनी थिएटरमध्ये खेचून आणण्यात अपयशी ठरला. यासंदर्भात बोलताना शाहरुख म्हणाला,"त्यावेळी मला असं वाटलं होतं, जेव्हा मी 'रा.वन' बनवेन तेव्हा सगळे म्हणतील, ही एक सुपरहिरो फिल्म आहे.पण, त्यात फक्त सुपरहिरोची कहाणी नव्हती तर व्हिजूअल इफेक्ट्स संदर्भात देखील होती. त्यामुळे बऱ्याच गोष्टी बदलतील असं वाटलं.पण, ती अपेक्षा खोटी ठरली. मात्र, चित्रपटाने चांगली कमाई केली."
शाहरुखने व्यक्त केली खंत, म्हणाला...
पुढे तो म्हणाला,"रा.वनमध्ये आणखीही महत्त्वाच्या गोष्टी दाखवण्यात आल्या होत्या. जसं की प्लेस्टेशन, व्हिडिओ गेम किंवा आयपॅड - ज्याबद्दल लोकांना त्यावेळी फारशी माहिती नव्हती.हे सगळं त्यामध्ये दाखवण्यात आलं होतं. आता प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे, तेव्हा फारसे नव्हते. आज कदाचित तो चित्रपट आला असता तर प्रेक्षकांना तो स्विकारला असता." अशी खंत सुद्धा शाहरुखने मुलाखतीत व्यक्त केली.