'एक शाहरुख में पूरा हिंदुस्तान बसता है', सोशल मीडियावर व्हायरल झाली शाहरूखवरील कविता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 18:59 IST2021-10-12T18:55:31+5:302021-10-12T18:59:20+5:30
Shahrukh Khan : एकीकडे त्याची प्रतिमा प्रभावित झाली आहे. तर दुसरीकडे अनेक ब्रॅन्ड शाहरूख खानपासून दूर जाताना दिसत आहेत.

'एक शाहरुख में पूरा हिंदुस्तान बसता है', सोशल मीडियावर व्हायरल झाली शाहरूखवरील कविता
बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खान (Shah Rukh Khan) चा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) च्या अटकेनंतर अभिनेता सतत चर्चेत आहे. आर्यन खान ड्रग्स प्रकरणात अडकल्यामुळे शाहरूख खानला जास्त नुकसान झेलावं लागत आहे. एकीकडे त्याची प्रतिमा प्रभावित झाली आहे. तर दुसरीकडे अनेक ब्रॅन्ड शाहरूख खानपासून दूर जाताना दिसत आहेत.
असं असलं तरी बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांचा या कठिण काळात शाहरूख खानला सपोर्ट मिळत आहे. सोशल मीडियावर फॅन्सकडूनही त्याला सपोर्ट मिळत आहे आणि या क्रमात आता कवी अखिल कात्याल ने शाहरूखसाठी एक कविता लिहिली आहे. ही कविता त्याने शाहरूखच्या सपोर्टमध्ये लिहिली आहे. ही कविता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
स्वरा भास्कर आणि कनिका ढिल्लनसहीत अनेक स्टार्सने या कवितेवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ही कविताही लोक भरभरून शेअर करत आहेत. अखिलने त्याच्या या कवितेत शाहरूख खानच्या वेगवेगळ्या भूमिकांचा उल्लेख केला आहे आणि सांगितलं आहे की, कशाप्रकारे त्याने जवळपास सर्वच धर्माच्या भूमिका साकारल्या आहेत.
— Akhil Katyal (@AkhilKatyal) October 11, 2021
कविता
वो कभी राहुल है, कभी राज
कभी चार्ली तो कभी मैक्स
सुरिंद्र भी वो, हैरी भी
वो देवदास भी और वीर भी
राम, मोहन, कबीर भी
वो अमर है, समर है
रिजवान, रईस, जहांगीर भी
शायद इसलिए कुछ लोगों के हलक में फंसता है
कि एक शाहरुख में पूरा हिंदुस्तान बसता है.
सुपरहिट सिनेमा 'मसान'चा डिरेक्टर नीरज घायवान, स्क्रीन रायटर कनिका ढिल्लन आणि अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी ही कविता लाईक केली आणि शेअर केली. आर्य़नबाबत सांगायचं तर आता त्याच्या जामिनावरील सुनावणी १३ ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे बघावं लागेल की, शाहरूख खानच्या मुलाला दिलासा मिळेल की, नाही.