"अभिनय सोडायचा विचार मनात आला होता.."; शाहरुख खानचा मोठा खुलासा, म्हणाला- "त्या दिवशी.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 13:26 IST2025-05-02T13:25:25+5:302025-05-02T13:26:37+5:30

Shah Rukh Khan Latest Interview Video: शाहरुख खानने Waves Summit 2025 मध्ये त्याच्या मनात अभिनय सोडायचा विचार आला होता, असा खुलासा केला. काय होतं यामागचं कारण, जाणून घ्या (shahrukh khan)

Shahrukh Khan made a big revelation once he thaught to quit acting waves summit 2025 | "अभिनय सोडायचा विचार मनात आला होता.."; शाहरुख खानचा मोठा खुलासा, म्हणाला- "त्या दिवशी.."

"अभिनय सोडायचा विचार मनात आला होता.."; शाहरुख खानचा मोठा खुलासा, म्हणाला- "त्या दिवशी.."

सध्या Waves Summit 2025 ची चर्चा आहे. मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर येथे हा शानदार इव्हेंट पार पडतोय. या इव्हेंटला बॉलिवूड आणि साउथ इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी उपस्थित होते. Waves Summit 2025 मध्ये शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांनी एका खास सेशनला हजेरी लावली. यावेळी शाहरुखने "एक वेळ अशी आली होती की मला अभिनय सोडावासा वाटत होता", असा खुलासा केला. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. काय म्हणाला शाहरुख? जाणून घ्या.

शाहरुखला अभिनय क्षेत्र का सोडावंंसं वाटतं?

शाहरुखने Waves Summit 2025 मध्ये करण जोहरशी बोलताना खुलासा केला की, "जेव्हा माझा एखादा सिनेमा फ्लॉप होतो तेव्हा ती गोष्ट मी खूप मनाला लावून घेतो. अनेक लोक थिएटरमध्ये या अपेक्षेने येतात की, शाहरुखचा सिनेमा आहे तर एंटरटेन नक्कीच करेल. पण जेव्हा त्यांच्या अपेक्षांना माझा सिनेमा खरा उतरत नाही,  तेव्हा मला खूप वाईट वाटतं. मी एक वाईट सिनेमा बनवलाय, असं मला सारखं वाटत राहतं. मी लोकांच्या विश्वासाचा अपमान केलाय, ही जाणीव मला आतल्या आत खात असते." 

"त्यानंतर माझी एक गोष्ट आहे की, मी बाथरुममध्ये जाऊन रडतो. दोन-तीन दिवस मी असाच दुःखी असतो.  खूप वाईट वाटतं, खूप रडायला येतं. एकदा तर असं झालं होतं की, मी कूकींग सुद्धा शिकायला घेतली होती. अभिनय क्षेत्र कायमचं सोडायचा माझा विचार होता. त्याऐवजी शेफ होऊया, असं मला वाटत होतं. परंतु मी हार मानली नाही." अशाप्रकारे शाहरुखने त्याच्या मनातील भावना शेअर केली. Waves Summit 2025  हा कार्यक्रम १ मे ते ४ मे पर्यंत मुंबईत पार पडणार आहे.

Web Title: Shahrukh Khan made a big revelation once he thaught to quit acting waves summit 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.