Shahrukh Khan Covid Positive: बॉलिवूडमध्ये कोरोनाचा विस्फोट; शाहरूख खान पॉझिटीव्ह, कतरिनालाही लागण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 18:21 IST2022-06-05T18:18:48+5:302022-06-05T18:21:00+5:30
Shah Rukh Khan Tests positive Covid-19: देशात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलं असून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत.

Shahrukh Khan Covid Positive: बॉलिवूडमध्ये कोरोनाचा विस्फोट; शाहरूख खान पॉझिटीव्ह, कतरिनालाही लागण
Shah Rukh Khan, Katrina Kaif Tests positive Covid-19: देशात पुन्हा एकदा कोरोनानं (Corona Virus) डोकं वर काढलं असून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार कोरोना पॉझिटीव्ह आढळला होता. तो बरा होत नाही तोच अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan), आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur), कतरिना कैफ (Katrina Kaif) यांनाही कोरोनाची लागण झाली.आता बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान (Shah Rukh Khan ) यालाही कथितरित्या कोरोनाची लागण झाल्याचे कळतेय. (Shah Rukh Khan Tests positive Covid-19 )अर्थात अद्याप शाहरूखच्या टीमकडून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
कालच कार्तिक आर्यनने तो कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती. कालच अभिनेता आदित्य रॉय कपूर यालाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. आज शाहरूख खानचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याचं कळतंय. सीएनएन-न्यूज 18 ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. शाहरूखने कालच ‘जवान’ या त्याच्या आगामी चित्रपटाचं पहिलं पोस्टर शेअर केलं होतं. त्याआधी ‘जवान’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. शाहरूख सध्या अनेक चित्रपटांत बिझी आहे. पठान, डंकी आणि जवान अशा तीन सिनेमांत तो झळकणार आहे.
कतरिना कैफही पॉझिटीव्ह
बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री कतरिना कैफ हिचा रिपोर्टही पॉझिटीव्ह आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कतरिना ‘क्रिसमस’ या चित्रपटाचं शूटींग सुरू करणार होती. मात्र यादरम्यान तिला कोरोनाची लागण झाल्याचं निदान झालं. याचमुळे ती आयफा अवार्ड सोहळ्यातही सामील झाली नाही. विकी कौशल एकटाच या सोहळ्यात सहभागी झाला.
करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीतून काही बॉलिवूड सेलेब्सना कोरोनाची लागण झाली असल्याचा दावा केला जात आहे. या पार्टीत सहभागी झालेल्या 50 ते 55 सेलेब्सना कोरोनाची लागण झाल्याचं म्हटलं जात आहे. अर्थात करणच्या एका जवळच्या व्यक्तिने ही निव्वळ अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे.