किती तासांचा पिक्चर आहे? चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुख म्हणाला, 'भाऊ तुझ्याकडे किती...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 13:24 IST2023-07-13T13:22:13+5:302023-07-13T13:24:08+5:30

शाहरुख अनेकदा ट्वीटरवर चाहत्यांशी संवाद साधत असतो.

shahrukh khan jawan movie chat with fans on twitter ask srk section fan asked what is duration of the movie shahrukh replied | किती तासांचा पिक्चर आहे? चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुख म्हणाला, 'भाऊ तुझ्याकडे किती...'

किती तासांचा पिक्चर आहे? चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुख म्हणाला, 'भाऊ तुझ्याकडे किती...'

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shahrukh Khan)आगामी 'जवान' (Jawan) सिनेमामुळे चर्चेत आहे. साऊथचा सुपरहिट दिग्दर्शक अॅटलीने जवानचं दिग्दर्शन केलं आहे. यामध्ये शाहरुख खानचा अॅक्शन अवतार पाहायला मिळतोय. सिनेमाचा प्रीव्ह्यू प्रेक्षकांना चांगलाच पसंतीस पडलाय. साऊथची आघाडीची अभिनेत्री नयनतारा शाहरुखसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. नुकतंच शाहरुखने ट्विटरवर चाहत्यांशी संवाद साधला. तेव्हा सिनेमा किती तासांचा आहे असा एक आगळावेगळा प्रश्न चाहत्याने विचारला. यावर शाहरुखने भन्नाट उत्तर दिलं आहे.

शाहरुख अनेकदा ट्वीटरवर चाहत्यांशी संवाद साधत असतो. asksrk या सेशनमध्ये तो चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत असतो. जवान निमित्त शाहरुखने आजही ट्वीटरवर सेशन घेतलं. काही मिनिटांसाठी एसआरके ट्वीटरवर आला आणि प्रश्नांची उत्तरं दिली. यात एका चाहत्याने निराळाच प्रश्न विचारला. त्याने लिहिलं, 'किती तासांचा सिनेमा आहे?'

आता यावर शाहरुखचा प्रश्नही काहीसा मजेदार आणि साहजिकच आहे. शाहरुखने रिप्लाय देत लिहिले,'तुझ्याजवळ किती वेळ आहे? तितकाच सिनेमा बघ भाऊ. खूप बिझी असतोस वाटतं.'

'जवान' ७ सप्टेंबर रोजी रिलीज होत आहे. व्हीएफएक्स आणि अॅक्शन सिनेमाचं मुख्य आकर्षण आहे. तसंच साऊथचा दिग्दर्शक आणि साऊथच्या कलाकारांची मांदियाळीच सिनेमात बघायला मिळणार आहे. दीपिका पदुकोणचा स्पेशल अॅपिअरन्सही बघायला मिळत आहे. 

Web Title: shahrukh khan jawan movie chat with fans on twitter ask srk section fan asked what is duration of the movie shahrukh replied