शाहरुखचा दिलदारपणा ! चाहतीसाठी किंग खानने दिला अक्षय कुमारचा ऑटोग्राफ, सांगितला मजेदार किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 11:52 IST2023-02-09T11:50:45+5:302023-02-09T11:52:18+5:30
मी एका चाहतीसाठी अक्षय कुमार बनलो होतो असं शाहरुख एका चॅट शोमध्ये म्हणाला

शाहरुखचा दिलदारपणा ! चाहतीसाठी किंग खानने दिला अक्षय कुमारचा ऑटोग्राफ, सांगितला मजेदार किस्सा
शाहरुख, सलमान किंवा आमिर या खान मंडळींसारखंच आपल्या फिटनेसने आणि हटके, विनोदी भूमिकांनी चाहत्यांचे मन जिंकणारा अक्षय कुमारचाही (Akshay Kumar) चाहता वर्ग मोठा आहे. अक्षय कुमारने ज्या ताकदीने देशभक्तीपर चित्रपट करतो त्याच आत्मविश्वासाने विनोदी भूमिकाही करतो. खिलाडी म्हणून तर त्याची जुनी ओळख आहे. अभिनेता शाहरुखला (Shahrukh Khan) तर एका चाहतीने अक्षय कुमारच समजले होते असा किस्सा स्वत: शाहरुखनेच एका मुलाखतीत सांगितला आहे.
मी एका चाहतीसाठी अक्षय कुमार बनलो होतो असं शाहरुख एका चॅट शोमध्ये म्हणाला. हा मजेदार किस्सा सांगताना शाहरुख म्हणाला, 'एकदा मी विमानतळावर होतो. तेव्हा एक चाहती आली आणि फोटो/ऑटोग्राफसाठी हट्ट धरला. मी म्हणलं खूप उशीर झालाय माझं फ्लाईट चुकेल. तरी ती काही ऐकत नव्हती आणि सतत हट्ट करत होती. मी घाईघाईत चेकइन केले आणि पुन्हा तिला ऑटोग्राफ द्यायला आलो. ती म्हणाली मी तुमची खूप मोठी फॅन आहे, आय लव्ह यू अक्षय.'
शाहरुखचा हा किस्सा ऐकून सर्वच हसायला लागतात. ती चाहती असं म्हणल्यावर शाहरुखने काय केले असे विचारले असता शाहरुख म्हणाला, 'मी तिला वाईट वाटू नये म्हणून अक्षयच्या नावानेच ऑटोग्राफ दिला.'
शाहरुखच्या या वर्तवणुकीतून त्याचा चांगुलपणाही दिसून आला. सध्या शाहरुखच्या पठाण सिनेमाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.तर आगामी 'डंकी' आणि 'जवान' सिनेमातही शाहरुखची प्रमुख भूमिका आहे.