Pathaan Twitter Review : फर्स्ट डे फर्स्ट शो...! ‘पठाण’ने पब्लिकला लावलं वेड, धमाकेदार आहे फर्स्ट रिव्ह्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 11:08 IST2023-01-25T11:06:08+5:302023-01-25T11:08:56+5:30

Pathaan Twitter Review : २०२३ चा सर्वात मोठा सिनेमा ‘पठाण’ चित्रपटगृहांत रिलीज झाला आहे आणि हा चित्रपट पाहून चाहते सुपर एक्साइटेड झाले आहेत.

shahrukh khan deepika padukone pathaan movie twitter review fans reaction | Pathaan Twitter Review : फर्स्ट डे फर्स्ट शो...! ‘पठाण’ने पब्लिकला लावलं वेड, धमाकेदार आहे फर्स्ट रिव्ह्यू

Pathaan Twitter Review : फर्स्ट डे फर्स्ट शो...! ‘पठाण’ने पब्लिकला लावलं वेड, धमाकेदार आहे फर्स्ट रिव्ह्यू

Pathaan Twitter Review : अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली... चार वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर किंगखान शाहरूख खान (Shah Rukh Khan) मोठ्या पडद्यावर परतला आहे. २०२३ चा सर्वात मोठा सिनेमा ‘पठाण’ चित्रपटगृहांत रिलीज झाला आहे आणि हा चित्रपट पाहून चाहते सुपर एक्साइटेड झाले आहेत. ट्विटरवर असंख्य चाहत्यांनी ‘पठाण’चा रिव्ह्यू शेअर केला आहे.

‘पठाण’मध्ये शाहरूख रॉ एजंटच्या भूमिकेत आहे. देशाला वाचवण्यासाठी तो शत्रूंशी दोन हात करताना दिसतो.  चाहत्यांना ‘पठाण’ने वेड लावलं आहे. फर्स्ट डे फर्स्ट शो पाहणारे चाहते ‘पठाण’चं कौतुक करताना थकत नाहीयेत.

एका फिल्म प्रोड्यूसरने ‘पठाण’ला ४.५ स्टार्स दिले आहेत. ‘पठाण’ एक हाय व्होल्टेज ॲक्शन ड्रामा असल्याचं त्यांनी लिहिलं आहे. ‘पठाण’ची कथा शानदार आहे आणि शाहरूखचा अभिनय जबरदस्त आहे. चित्रपटात अनेक सरप्राइजेस असल्याचं त्यांनी आपल्या रिव्ह्यूमध्ये म्हटलं आहे.

दिग्गज चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनीही ‘पठाण’ला साडे चार स्टार्स दिले आहेत. स्टार पॉवर, स्टाईल, स्केल, सॉन्ग, सोल ॲण्ड सरप्राइजेस... हे सगळं पठाणमध्ये असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हा सिनेमा या वर्षातला ब्लॉकबस्टर ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

समीक्षक Sumit Kadel यांनी ‘पठाण’चं कौतुक केलं आहे. भारतीय सिनेमाच्या इतिहासातील आत्तापर्यंतचा बेस्ट सीक्वेन्स... या चित्रपटाने थिएटरला स्टेडिअम बनवलं. बाप रे बाप क्या ॲक्शन है, असं त्यांनी लिहिलं आहे.

चाहतेही भारावले...

‘पठाण’ पाहून चाहतेही भारावले आहेत. मी आत्ताच ‘पठाण’ पाहिला. मी काय बोलू या, जा आणि बघा..., असं एका चाहत्याने लिहिलं आहे.  

अनेक शहरात ‘पठाण’ पाहण्यासाठी चाहत्यांच्या रांगा लागल्या आहेत. चाहते चित्रपटगृहाबाहेर जल्लोष करत आहेत. पाटण्यातील हे एक चित्र...

अनेक ठिकाणी चाहत्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. चाहते जणू सैराट झाले आहेत.

पहिल्या दिवशी कमावणार इतके कोटी...
जाणकारांच्या मते, ‘पठाण’ रिलीजच्या पहिल्या दिवशीच ३९ ते ४१ कोटींचा बिझनेस करू शकतो. अर्थात ‘पठाण’ने पहिल्या दिवशी ४० कोटी कमावले तरीही हा सिनेमा शाहरूखच्या हॅपी न्यू ईअर या बिग ओपनर सिनेमाचा मुकाबला करू शकणार नाहीये. हॅपी न्यू ईअर हा शाहरूखचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा ओपनर सिनेमा आहे. या सिनेमाने पहिल्या दिवशी ४४ कोटींची कमाई केली होती. 

 

Web Title: shahrukh khan deepika padukone pathaan movie twitter review fans reaction