'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 09:19 IST2025-12-15T09:18:27+5:302025-12-15T09:19:11+5:30
रॅपर 'फ्लिपराची'च्या गाण्यावर अक्षय खन्नाचा डान्स तर सर्वांना आवडला. आता शाहरुखचाही बघा

'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
'धुरंधर' या सध्याच्या चर्चेतील सिनेमामध्ये अक्षय खन्नाचा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. fa9la च्या गाण्यावर अक्षय खन्ना आपल्या स्टाईलमध्ये, स्वॅगमध्ये डान्स करतोय. या एका व्हिडीओने अक्षय खन्नाने सोशल मीडियावर धुमाकूळच घातला आहे. इतक्या वर्षांनी अक्षय खन्नाला तो खरोखर ज्यासाठी पात्र आहे असं यश मिळत आहे. दरम्यान एआयच्या जगात काय होईल सांगता येत नाही. अक्षय खन्नाच्या जागी शाहरुख खानचा एआय व्हिडीओही आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
रॅपर 'फ्लिपराची'च्या गाण्यावर अक्षय खन्नाचा डान्स तर सर्वांना आवडला. यावर अनेक लोक रील्सही बनवत आहेत. तर आता अक्षयच्या दागी किंग खानचा व्हिडीओ एआयने बनवला आहे. हाही व्हिडीओ शाहरुखचे चाहते व्हायरल करत आहेत. यामध्ये शाहरुखची स्टाईल, त्याची ती किलर स्माईल दिसत आहे. पण अक्षय खन्नाची जागा खरंच कोणी घेऊ शकतं का? यावर नेटकऱ्यांमध्ये तुफान चर्चा सुरु आहे.
शाहरुखच्या व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी म्हणतात, 'सबका टाईम आता है, ये टाईम अक्षय खन्ना का है','मी शाहरुखचा चाहता आहे पण या सीनमध्ये अक्षय खन्नाने मन जिकलं आहे','अक्षय खन्नाच बेस्ट आहे'. तर दुसरीकडे शाहरुखच्या चाहत्यांनी सिनेमात किंग खान असता तर सिनेमा आणखी सुपर डुपर हिट असता असा दावा केला आहे. 'और मजा आता, किंग खान है भाई वो! जबरा फॅन हूँ मै' अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.
'धुरंधर' सिनेमाने यशस्वीरित्या दुसऱ्या आठवड्यात पदार्पण केलं आहे. सिनेमा पाहून प्रेक्षक प्रभावित झाले आहेत. इंडस्ट्रीतील अनेक आघाडीच्या अभिनेत्यांनीही 'धुरंधर'चं कौतुक केलं आहे. सिनेमाने आतापर्यंत ३०० कोटी पार कमाई केली आहे.