शाहिद कपूर 'नायक' तर नाना पाटेकर 'खलनायक'? 'ओ रोमिओ'चा थरकाप उडवणारा टीझर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 13:16 IST2026-01-10T13:16:17+5:302026-01-10T13:16:55+5:30
O Remeo Teaser: शाहिद कपूर - नाना पाटेकर आमनेसामने. ओ रोमिओचा रक्तरंजित आणि हटके टीझर बघाच

शाहिद कपूर 'नायक' तर नाना पाटेकर 'खलनायक'? 'ओ रोमिओ'चा थरकाप उडवणारा टीझर रिलीज
शाहिद कपूर आणि विशाल भारद्वाज ही जोडी पुन्हा एकदा चित्रपटगृहात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यांच्या आगामी 'ओ रोमियो' (O Romeo) या चित्रपटाचा टीझर आज १० जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित झाला असून, यामध्ये शाहिद कपूरचा असा अवतार पाहायला मिळत आहे जो यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. विशेष म्हणजे नाना पाटेकर यांची छोटीशी भूमिकाही लक्षवेधी ठरत आहे
विशाल भारद्वाज आणि शाहिद कपूर यांनी यापूर्वी 'कमीने' आणि 'हैदर' सारखे क्लासिक चित्रपट दिले आहेत. आता 'ओ रोमियो'च्या माध्यमातून ही जोडी तिसऱ्यांदा एकत्र आली असून, या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. टीझरमध्ये शाहिद कपूर रक्ताने माखलेल्या चेहऱ्यासह, अंगावर गोंदवलेले टॅटू अशा लूकमध्ये दिसत आहे. त्याच्या या 'खूंखार' रूपाने चाहत्यांची धडकी भरवली आहे.
असे म्हटले जात आहे की, या पात्रासाठी शाहिदने आपल्या शरीरावर पूर्ण अंगावर टॅटू काढले आहेत, जे केवळ मेकअप नसून कथेचा एक महत्त्वाचा भाग आहेत. याच टीझरमध्ये नाना पाटेकर 'धक धक करने लगा', हे गाणं गात वेगळ्याच अंदाजात बघायला मिळत आहेत. नाना आणि शाहिद 'पाठशाला' सिनेमानंतर पुन्हा एकत्र काम करत आहेत.
या चित्रपटात शाहिद कपूरसोबत तृप्ती डिमरी (Triptii Dimri) मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय चित्रपटात नाना पाटेकर, तमन्ना भाटिया, दिशा पटानी, विक्रांत मेस्सी आणि अविनाश तिवारी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. विशाल भारद्वाज यांच्या नेहमीच्या शैलीप्रमाणे हा चित्रपट देखील वास्तववादी आणि तितकाच प्रभावी असण्याची शक्यता आहे. 'ओ रोमियो' ही शेक्सपिअरच्या प्रसिद्ध 'रोमियो अँड ज्युलिएट' या नाटकावर आधारित एक 'डार्क' आवृत्ती असल्याचे सांगितले जात आहे. हा चित्रपट व्हॅलेंटाईन विकमध्ये, म्हणजेच १३ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.