'या' व्यक्तींना लकी चार्म मानतो किंग खान शाहरुख, अनन्या पांडेनं केला खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 16:16 IST2024-03-29T16:15:37+5:302024-03-29T16:16:39+5:30

केकेआरच्या पहिल्या आयपीएल विजयानंतर शाहरुख खान 'या' व्यक्तींना म्हणाला होता 'लकी चार्म्स'

Shah Rukh Khan Considers Suhana Ananya And Shanaya As His Lucky Charm King Khan Said This After Kkr Ipl Win | 'या' व्यक्तींना लकी चार्म मानतो किंग खान शाहरुख, अनन्या पांडेनं केला खुलासा!

'या' व्यक्तींना लकी चार्म मानतो किंग खान शाहरुख, अनन्या पांडेनं केला खुलासा!

शाहरुख खान हा हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. शाहरुख खानलाबॉलिवूडमधील किंग खान या नावाने ओळखले जाते. शाहरुखचं वैयक्तिक आयुष्यही एका राजासारखंच आहे. शाहरुख आपल्या अभिनयाच्या जोरावर एका चित्रपटात कोटींची कमाई करतो. अभिनय क्षेत्रात तर किंग खानचा पाय रोवला गेला आहे पण शाहरुख क्रिकेटद्वारेसुद्धा बक्कळ कमाई करतो. जेव्हा पहिल्यांदा कोलकाता नाइट रायडर्सने त्यांची पहिली आयपीएल स्पर्धा जिंकली होती, तेव्हा शाहरुखने काही खास व्यक्तींना लकी चार्म असल्याचं म्हटलं होतं. 

शाहरुखने लकी चार्म म्हटलेल्या या खास व्यक्ती म्हणजे सुहाना आणि सुहानाच्या मैत्रिणी आहेत. अर्थात अनन्या पांडे आणि शनाया कपूर या आहेत. नुकतेच अनन्या पांडेनं 'नो फिल्टर नेहा'ला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला. ती म्हणाली, 'जेव्हा कोलकाता नाइट रायडर्सने त्यांची पहिली आयपीएल स्पर्धा जिंकली होती.  त्यानंतर शाहरुखने मला, सुहाना आणि शनायाला त्यांचं लकी चार्म म्हटलं होतं'. सुहाना, अन्यया पांडे आणि शनाया यांच्यात लहानपणापासूनच घट्ट मैत्री आहे. 

ऐवढचं नाही तर  शनायाची आई महीप कपूर आणि अनन्याची आई भावना पांडे यांची किंग खानची पत्नी गौरी खानशी चांगली मैत्री आहे.  या तिघींनी कॉफी विथ करणच्या एका एपिसोडमध्ये हजेरी लावली होती. सुहानाने 2023 मध्ये झोया अख्तरच्या 'द आर्चीज'मधून पदार्पण केलं आहे. मोहनलालच्या 'वृषभा' या चित्रपटातून शनाया डेब्यू करत आहे. तर अनन्यानं 'स्टुडंट ऑफ द इअर २' मधून डेब्यू केला होता. यानंतर तिने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. 

Web Title: Shah Rukh Khan Considers Suhana Ananya And Shanaya As His Lucky Charm King Khan Said This After Kkr Ipl Win