'लाइफ इन मेट्रो'च्या सिक्वलमध्ये तापसी पन्नूऐवजी फातिमा सना शेखची वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 18:15 IST2018-10-01T18:08:20+5:302018-10-01T18:15:17+5:30

'लाइफ इन मेट्रो' चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला होता. यात धर्मेंद्र, शिल्पा शेट्टी, इरफान खान, केके मेनन, शर्मन जोशी यांसारख्या कलाकारांनी काम केले होते. आता या चित्रपटाचा सिक्वल येत आहे.

In the sequel of 'Life in Metro', Fatima Sana Shekh, instead of Tapasi Pannu | 'लाइफ इन मेट्रो'च्या सिक्वलमध्ये तापसी पन्नूऐवजी फातिमा सना शेखची वर्णी

'लाइफ इन मेट्रो'च्या सिक्वलमध्ये तापसी पन्नूऐवजी फातिमा सना शेखची वर्णी

ठळक मुद्दे‘लाइफ इन अ मेट्रो’च्या सिक्वलमध्ये आता तापसीऐवजी दिसणार फातिमा 'लाइफ इन मेट्रो' चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला


'लाइफ इन मेट्रो' चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला होता. यात धर्मेंद्र, शिल्पा शेट्टी, इरफान खान, केके मेनन, शर्मन जोशी यांसारख्या कलाकारांनी काम केले होते. चार शहरांतील चार कथा असलेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर उत्तम प्रतिसाद मिळाला होता. समीक्षकांनीही चित्रपटाची प्रशंसा केली होती. आता त्याचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तापसी पन्नूचे नाव चर्चेत होते. मात्र आता तिच्या जागी फातिमा सना शेखची वर्णी लागल्याचे समजते आहे.


'लाइफ इन मेट्रो' या चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा काही महिन्यापूर्वी दिग्दर्शक अनुराग बासूने केली. त्यामुळे चित्रपटात कोणत्या नव्या जोड्या पाहायला मिळणार याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. सिक्वलसाठी राजकुमार रावनंतर तापसी पन्नूचे नाव चर्चेत होते. मात्र तापसीने माघार घेतली असून आता तिच्याऐवजी दंगल गर्ल फातिमा सना शेखची वर्णी लागली आहे. तापसी सध्या इतर चित्रपटात व्यग्र आहे. तसेच ‘लाइफ इन अ मेट्रो’च्या चित्रीकरणासाठी तापसीकडे तारखा उपलब्ध नाहीत. त्यामुळे तिने या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे तेव्हा ‘लाइफ इन अ मेट्रो’च्या सिक्वलमध्ये आता तापसीऐवजी फातिमा दिसणार आहे हे जवळजवळ निश्चित करण्यात आले आहे.

फातिमासोबतच करिना कपूर, अर्जून कपूर, अभिषेक बच्चन इलियाना डिक्रूझ, राजकुमार राव, परिणिती चोप्रा ही नाव देखील चर्चेत आहेत. सारेच मोठे कलाकार असल्यामुळे चित्रपटासाठी इतक्या कलाकारांच्या तारखा जुळवणे ही कठीण बाब आहे. ‘लाइफ इन अ मेट्रो’च्या सिक्वलची पटकथा अनुरागने स्वत: लिहिली असून त्याच्याच प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती होणार आहे. पहिल्या भागाप्रमाणेच यामध्येही वेगवेगळ्या कथा असणार आहेत. 

Web Title: In the sequel of 'Life in Metro', Fatima Sana Shekh, instead of Tapasi Pannu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.