'छावा' पाहिल्यानंतर शाळकरी मुलांनी केलं असं काही, होतोय कौतुकाचा वर्षाव, थिएटरमधील व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 15:55 IST2025-02-21T15:55:14+5:302025-02-21T15:55:56+5:30
'छावा' सिनेमाच्या स्क्रिनिंगदरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये थिएटर शाळकरी मुलांनी भरुन गेल्याचं दिसत आहे.

'छावा' पाहिल्यानंतर शाळकरी मुलांनी केलं असं काही, होतोय कौतुकाचा वर्षाव, थिएटरमधील व्हिडिओ व्हायरल
विकी कौशलचा 'छावा' सिनेमा संपू्र्ण जगभरात गाजत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं आहे. पहिल्या दिवसापासूनच थिएटरमध्ये 'छावा' पाहण्यासाठी गर्दी होत आहे. 'छावा' सिनेमाच्या स्क्रिनिंगदरम्यानचे थिएटरमधील अनेक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. अशातच एका व्हिडिओ सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
'छावा' सिनेमाच्या स्क्रिनिंगदरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये थिएटर शाळकरी मुलांनी भरुन गेल्याचं दिसत आहे. 'छावा' सिनेमा संपल्यानंतर सगळी मुलं उठून उभी राहिल्याचं दिसत आहे. त्यानंतर त्या शाळकरी मुलांनी गारद म्हणत महाराजांना मानवंदना दिली. हा व्हिडिओ तेलंगणामधील असल्याचं म्हटलं जात आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. शिव ठाकरेनेदेखील या व्हिडिओवर कमेंट केली आहे.
दरम्यान, 'छावा' सिनेमात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहे. अक्षय खन्नाने या सिनेमात औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर २०० कोटींचा टप्पा पार केला आहे.