'आज मला माझ्या मंसूरची खूप आठवण येतीये', सुशांतच्या आठवणीत भावूक झाली सारा अली खान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 17:47 IST2021-12-07T17:41:37+5:302021-12-07T17:47:01+5:30
Sara Ali Khan : भलेही सुशांत या जगात नाही, पण सारा तिच्या करिअरमध्ये सुशांतचं योगदान विसरलेली नाही. 'केदारनाथ' ला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत.

'आज मला माझ्या मंसूरची खूप आठवण येतीये', सुशांतच्या आठवणीत भावूक झाली सारा अली खान
सध्या सारा अली खान (Sara Ali Khan) फारच इमोशनल आहे आणि सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) ची आठवण काढत आहे. सारा अली खानने आजच्याच दिवशी ३ वर्षाआधी म्हणजे ७ डिसेंबर २०१८ मध्ये सुशांतच्या 'केदारनाथ'मधून बॉलिवूडमध्ये पाउल ठेवलं होतं. त्या सिनेमात सुशांत आणि साराच्या जोडीला फार पसंत केलं गेलं होतं. सुशांत आता या जगात नाही. गेल्यावर्षी त्याचं निधन झालं.
भलेही सुशांत या जगात नाही, पण सारा तिच्या करिअरमध्ये सुशांतचं योगदान विसरलेली नाही. 'केदारनाथ' ला तीन वर्षे पूर्ण (3 years of Kedarnath) झाली आहेत. अशात साराने तिच्या 'मंसूर'ला म्हणजे सुशांत सिंह राजपूतची आठवण काढली आहे. तिने सिनेमातील एक व्हिडीओ क्लिप इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. सोबतच सांगितलं की, कशाप्रकारे सुशांतच्या सपोर्टने आणि मदतीने ती प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहचण्यात यशस्वी ठरली.
सारा अली खानने लिहिलं की, '३ वर्षाआधी माझं सर्वात मोठं स्वप्न पूर्ण झालं. मी अभिनेत्री बनले आणि माझा सर्वात पहिला व स्पेशल सिनेमा रिलीज झाला. मला नाही वाटत की, मी कधी सांगू शकेन की, माझ्यासाठी केदारनाथ सिनेमा किती महत्वाचा आहे. पण मला माझ्या मंसूरची फार आठवत येत आहे. हे केवळ सुशांतच्या सपोर्टमुळे, निस्वार्थ मदतीमुळे, मार्गदर्शनामुळे आणि सल्ल्यामुळे झालं. ज्यामुळे मुक्कू(तिच्या भूमिकेचं नाव) तुमच्या मनापर्यंत पोहोचू शकली. तुझी नेहमी आठवण येईल सुशांत'.