VIDEO : सुंदर नर्सचं गेटअप करत होता वरूण धवन, सारा अली खानने केली गंमत तर लाजला....
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 10:03 IST2020-12-18T10:01:32+5:302020-12-18T10:03:46+5:30
साला अली खान आणि वरूण धवन सध्या त्यांच्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. सारा अली खानने शूटींग दरम्यानचा एक व्हिडीओ शेअर केलाय

VIDEO : सुंदर नर्सचं गेटअप करत होता वरूण धवन, सारा अली खानने केली गंमत तर लाजला....
आता सारा अली खान आणि वरूण धवन यांचा आगामी 'कुली नंबर वन' रिलीज व्हायला आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. जसजशी रिलीज डेट जवळ येत आहे दोन्ही स्टार्सचा सोशल मीडियावरील वावर वाढलाय. सारा अली खानने सेटवरील एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात ती वरूण धवनसोबत मस्ती करताना दिसत आहे.
साला अली खान आणि वरूण धवन सध्या त्यांच्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. सारा अली खानने शूटींग दरम्यानचा एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात वरूण एका नर्सच्या गेटअपमध्ये दिसत आहे. साराने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.
या व्हिडीओबाबत सांगायचं तर फॅन्सना दोघांचाही हा नवा अंदाज पसंत पडतोय. या व्हिडीओत आपण बघू शकतो की, वरूण धवन त्याच्या रोलसाठी तयार होत आहे आणि तेव्हाच सारा अली खान त्याच्यासोबत मस्ती करू लागते. काही तासातच या व्हिडीओला ३३ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
दरम्यान, नुकतंच सारा आणि वरूणच्या या 'कुली नंबर वन' सिनेमातील 'मम्मी कसम' हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. जे प्रेक्षकांना आवडलेलं दिसतंय. सारा अली खान आणि वरूण धवनचा कुली नंबर वन हा सिनेमा येत्या २५ डिसेंबरला रिलीज होणार आहे. आता आधीच्या सिनेमा तुलनेत या सिनेमाला कसा प्रतिसाद मिळतो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.