​संजय लीला भन्साळींनी ‘पद्मावत’बद्दल केला नव्याने खुलासा! चाहत्यांचे मानले आभार!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 14:09 IST2018-01-15T08:34:52+5:302018-01-15T14:09:57+5:30

आजपर्यंतच्या सिने इतिहासात सर्वाधिक वादग्रस्त ठरलेला संजय लीला भन्साळी दिग्दर्शित  ‘पद्मावत’ हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला रिलीज होणार आहे. ...

Sanjay Leela Bhansali new disclosure of 'Padmavat'! Thanks to fans! | ​संजय लीला भन्साळींनी ‘पद्मावत’बद्दल केला नव्याने खुलासा! चाहत्यांचे मानले आभार!!

​संजय लीला भन्साळींनी ‘पद्मावत’बद्दल केला नव्याने खुलासा! चाहत्यांचे मानले आभार!!

पर्यंतच्या सिने इतिहासात सर्वाधिक वादग्रस्त ठरलेला संजय लीला भन्साळी दिग्दर्शित  ‘पद्मावत’ हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला रिलीज होणार आहे. काल या चित्रपटाची रिलीज डेट अधिकृतरित्या जारी करण्यात आली. तामिळ, तेलगू आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये रिलीज होणा-या या चित्रपटाचे नव्या टाईटलसह नवे पोस्टरही मेकर्सनी जारी केले. या पोस्टरद्वारे ‘पद्मावत’चे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी पुन्हा एका स्पष्टीकरण दिले आहे. होय, एक जाहिरात प्रसिद्ध करत, भन्साळींनी या चित्रपटावरून सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आपली बाजू नव्याने स्पष्ट केली आहे.



‘पद्मावत’ हा चित्रपट मलिक मोहम्मद जायसीने लिहिलेल्या ‘पद्मावत’ नामक  महाकाव्यावर आधारित आहे. या चित्रपटात राणी पद्मावती आणि अलाऊद्दीन खिल्जी यांच्यात कुठलाही रोमॅन्टिक ड्रीम सीक्वेंस नाही. आम्ही हा चित्रपट अतिशय जबाबदारीने बनवला असून राजपूत मर्यादेचा संपूर्ण सन्मान केला आहे, असे या जाहिरातीत लिहिले गेले आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटात ८०० कट्स सुचवले, ही चर्चाही भन्साळींनी अफवा ठरवली आहे. सेन्सॉरबोर्डाने केवळ पाच दुरूस्त्यांसह हा चित्रपट पास केला, असे भन्साळींनी स्पष्ट केले आहे. याशिवाय संबंधित प्रशासन, सेन्सॉर बोर्ड आणि मनोरंजन विश्व आणि चाहत्यांचे आभारही मानले आहेत.

ALSO READ : संजय लीला भन्साळींना अंक शास्त्राचा ‘आधार’! ‘पद्मावती’तील I गेला आणि आला अधिकचा A !

शूटींगच्या पहिल्या दिवसापासून भन्साळींचा ‘पद्मावत’ वादात सापडला आहे. अनेक वादानंतर काही दुरूस्त्यांसह सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाच्या रिलीजला परवानगी दिली. पण यानंतरही करणी सेनेने चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी लावून धरलीय. अलीकडे चित्तोडगड येथे सर्व समाजाची बैठक झाली. या बैठकीत ‘पद्मावत’  विरोधातील आंदोलनाची नवी रणनिती ठरवण्यात आली. त्यानुसार,  येत्या २५ जानेवारीला ‘पद्मावत’ रिलीज झाला तर आम्ही  ‘जोहार’च्या आठवणी पुन्हा ताज्या करू, असा इशारा राजस्थानातील महिलांनी दिला आहे. चित्तोडगडच्या ज्या किल्लयावर राणी पद्मावतीने  ‘जोहार’ केले होते, त्याचठिकाणाहून या महिलांनी हा इशारा दिला.  

Web Title: Sanjay Leela Bhansali new disclosure of 'Padmavat'! Thanks to fans!