"काही चित्रपट प्रेक्षकांपर्यंत...", 'सनम तेरी कसम'च्या अपयशावर पहिल्यांदा व्यक्त झाला हर्षवर्धन राणे, म्हणाला..
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 16:30 IST2025-02-08T16:28:30+5:302025-02-08T16:30:19+5:30
'सनम तेरी कसम' (Sanam Teri Kasam) हा चित्रपट लोकप्रिय बॉलिवूड चित्रपटांपैकी एक आहे.

"काही चित्रपट प्रेक्षकांपर्यंत...", 'सनम तेरी कसम'च्या अपयशावर पहिल्यांदा व्यक्त झाला हर्षवर्धन राणे, म्हणाला..
Harshwardhan Rane: 'सनम तेरी कसम' (Sanam Teri Kasam) हा चित्रपट लोकप्रिय बॉलिवूड चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता हर्षवर्धन राणे (Harshwardhan Rane) आणि मावरा होकेन यांची मुख्य भूमिका होती. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. परंतु असं असतानाही चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करता आली नाही. सध्या व्हॅलेंटाईन वीकमध्ये हा सिनेमागृहात सनम तेरी कसम पुन्हा प्रदर्शित करण्यात आला आहे. 'सनम तेरी कसम' पुन्हा रिलीज होण्यापूर्वीच ॲडव्हान्स बुकिंग सुरू करण्यात आली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने पहिल्याच दिवशी सुमारे २० हजार रुपयांची तिकिटे विकली गेली. दरम्यान, अशातच अभिनेता हर्षवर्धन राणेने आपल्या मनातील खंत व्यक्त केली आहे.
नुकतीच हर्षवर्धन राणेने मीडियासोबत खास बातचीत केली. त्यादरम्यान, अभिनेत्याने सनम तेरी कसम च्या अपयशावर भाष्य केलं. त्यावेळी अभिनेता म्हणाला, "जेव्हा हा चित्रपट पहिल्यांदा बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला तेव्हा तो फारसा चांगला चालला नाही. आणि आमच्यासाठी तो एक वेदनादायी अनुभव होता."
पुढे अभिनेता म्हणाला, "बऱ्याचदा काही चित्रपट त्यांच्या रिलीजच्या वेळी प्रेक्षकांपर्यंत पोहचत नाहीत. परंतु कालांतराने त्या चित्रपटांना लोकप्रियता मिळते." असं म्हणत अभिनेत्याने काही चित्रपटांची उदाहरणे सुद्धा दिली. हे चित्रपटांनी सुरुवातीच्या वेळी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नाही, परंतु नंतर त्यांना प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळालं, असं तो म्हणाला.
'सनम तेरी कसम' हिंदी सिनेमाच्या इतिहासात सर्वात लोकप्रिय अशी लव्हस्टोरी आहे. २०१६ साली आलेला हा रोमँटिक हिंदी सिनेमा आजही चाहत्यांच्या मनात घर करुन आहे. दरम्यान, 'सनम तेरी कसम' मध्ये हर्षवर्धन राणे आणि मावरा होकेनसह मनीष चौधरी, मुरली शर्मा, अनुराग सिन्हा, विजय राज, सुदेश बेरी, कमल आदिब हे अनुभवी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत होते.