घटस्फोटानंतर अभिनेत्री सामंथाचा मोठा खुलासा, म्हणाली - आधी होत नव्हती हिंमत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 13:47 IST2022-05-09T13:47:08+5:302022-05-09T13:47:38+5:30
Samantha On Getting Bold: सामंथा आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजासाठी फेमस झाली आहे. आपल्या बोल्ड अंदाजाबाबत सामंथाने नुकतंच तिचं मतही व्यक्त केलं आहे.

घटस्फोटानंतर अभिनेत्री सामंथाचा मोठा खुलासा, म्हणाली - आधी होत नव्हती हिंमत...
Samantha On Getting Bold: साऊथची अभिनेत्री सामंथा रूथ प्रभु (Samantha Ruth Prabhu) घटस्फोटानंतर आता करिअरवर फोकस करत आहे. सामंथाचे अनेक मोठे प्रोजेक्ट्स पाइपलाईनमध्ये आहेत. सोबतच सामंथा एकापेक्षा एक शानदार फोटोशूटही करत आहे. तिचे हे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सामंथा आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजासाठी फेमस झाली आहे. आपल्या बोल्ड अंदाजाबाबत सामंथाने नुकतंच तिचं मतही व्यक्त केलं आहे.
अभिनेत्री सामंथा एका प्रसिद्ध मॅगझिनसाठी मे-जून २०२२ ची कव्हर गर्ल असेल. 'पीकॉक मॅगझिन' च्या कव्हर पेजसाठी अभिनेत्री बोल्ड पोज दिल्या आहेत. आपल्या करिअरबाबत बोलताना सामंथा म्हणाली की, एक वेळ अशी होती की, मला माझ्या त्वचेबाबत असहज वाटत होतं.
सामंथाने आपल्या कव्हर शूटचा एक फोटो शेअऱ करत लिहिलं की, 'मला वाटतं की, इतक्या साऱ्या प्रोजेक्टवर काम केल्यानंतर आता मी म्हणू शकते की, मी कॉन्फिडेंट आहे आणि तो वय व मॅच्योरिटीसोबत येतो'.
ती म्हणाली की, 'मला माझ्या त्वचेसोबत सहज होण्यासाठी थोडा वेळ लागला. मी वेगवेगळ्या भूमिका आत्मविश्वासाने साकारते. मग ते एखादं सेक्सी गाणं असो वा हार्डकोर अॅक्शन असो, जे मी आधी करण्याची हिंमत करू शकत नव्हते'.
दरम्यान, सामंथाच्या आगामी प्रोजेक्ट्सबाबत सांगायचं तर ती 'शकुंतलम' आणि 'यशोदा' सारख्या सिनेमात दिसणार आहे. 'पुष्पा' सिनेमातील आयटम नंबरने सामंथाला जगभरातून प्रेम मिळालं. आता तिच्याके मोठमोठ्या ऑफर आहेत.
काही महिन्यांपूर्वी सामंथा तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत होती. सामंथा आणि नागा चैतन्यने अचानक वेगळे होण्याचा निर्णय घेतला. सामंथा आणि नागाचं लग्न चार वर्षातच मोडल्यान फॅन्सही हैराण झाले होते. पण आता ती त्यातून बाहेर पडून आपल्या कामावर फोकस करत आहे.