समंथाच्या हॅण्डबॅगची किंमत ऐकून व्हाल थक्क; तेवढ्या किंमतीत खरेदी करु शकता एक शानदार बाईक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 17:49 IST2022-01-09T17:48:14+5:302022-01-09T17:49:21+5:30
Samantha ruth prabhu: समंथाची ही नवी हॅण्डबॅग Dior's च्या नवीन कलेक्शनमधली आहे.

समंथाच्या हॅण्डबॅगची किंमत ऐकून व्हाल थक्क; तेवढ्या किंमतीत खरेदी करु शकता एक शानदार बाईक
दाक्षिणात्य कलाविश्वातील नावाजलेलं व्यक्तीमत्त्व म्हणजे समंथा रुथ प्रभू (Samantha) . उत्तम अभिनयामुळे चर्चेत येणारी ही अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत आहे. अलिकडेच तिच्या आणि नागा चैतन्यच्या (Naga Chaitnya) घटस्फोटाच्या चर्चां कमी झाल्या आहेत. मात्र, आता तिच्या लक्झरी लाइफस्टाइलची चर्चा होऊ लागली आहे. अलिकडेच समंथाने सोशल मीडियावर तिचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तिच्या हातात असलेली हॅण्डबॅगची किंमत प्रचंड असून त्यात एक बाईक नक्कीच येऊ शकते.
सोशल मीडियावर सक्रीय असणारी समंथा अनेकदा तिचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. यात अलिकडेच तिने तिचा एक ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या हातात एक लहानशी हॅण्डबॅग दिसत आहे. विशेष म्हणजे समंथाच्या हातात असलेली ही बॅग साधीसुधी नसून Dior's च्या नव्या कलेक्शनमधील आहे.
Dior's च्या नवीन कलेक्शनमधील असलेली समंथाची ही हॅण्डबॅग चक्क २.५ लाख रुपये किंमतीची असल्याचं सांगण्यात येतं. क्रिस्टेन डायरच्या अधिकृत वेबसाइटवर ही हॅण्डबॅग उपलब्ध असून त्यावर त्याची किंमत २.५ लाख रुपये असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, हा फोटो शेअर करत समंथाने लक्ष वेधणारं कॅप्शन दिलं आहे. "पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणा दर्शवतो. म्हणूनच, तो कोणत्याही रंगात सहज मिसळून जातो", असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. समंथा अनेकदा तिच्या लक्झरी लाइफमुळे चर्चेत येत असते. यापूर्वीही तिच्या अनेक बॅग्स किंमतीमुळे चर्चेत आल्या आहेत. विशेष म्हणजे समंथाला बॅग्सचं कलेक्शन करायला खूप आवडतं असं म्हटलं जातं.