रश्मिका मंदानाला मागे टाकत सामंथा बनली साऊथमधील दुसरी महागडी अभिनेत्री, मग पहिली कोण आहे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 15:10 IST2022-03-10T15:10:16+5:302022-03-10T15:10:42+5:30
Samantha Ruth Prabhu : १७ डिसेंबरला रिलीज झालेल्या अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' सिनेमात आयटम नंबर करून सामंथा चांगलीच फेमस झाली.

रश्मिका मंदानाला मागे टाकत सामंथा बनली साऊथमधील दुसरी महागडी अभिनेत्री, मग पहिली कोण आहे?
Samantha Ruth Prabhu : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार सामंथा रूथ प्रभू अलिकडे सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. ती तिच्या फॅन्ससाठी तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अशात तिच्याबाबत आणखी एक चर्चा सुरू आहे ज्याबाबत वाचून तिचे फॅन्स खूश झाले आहेत. ही चर्चा आहे तिच्या कमाईबाबत. आता सामंथा साऊथ इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी असल्याने तिच्या कमाईची चर्चा तर रंगणारच.
२०१० साली आलेल्या 'विन्नईथांडी वरुवाया' मध्ये एक कॅमिओ रोलने तिने तिच्या करिअरची सुरूवात केली होती. १७ डिसेंबरला रिलीज झालेल्या अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' सिनेमात आयटम नंबर करून ती चांगली फेमस झाली. टॉलिवूडच्या रिपोर्टनुसार, सामंथा आता साऊथ इंडस्ट्रीतील दुसरी सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे. असं सांगितलं जात आहे की, सामंथा एका सिनेमासाठी ३ ते ४ कोटी रूपये घेते. तेच अभिनेत्री नयनतारा ही एका सिनेमासाठी ५ ते ६ कोटी रूपये घेते.
२०२२ मधील एका मीडिया रिपोर्टनुसार, सामंथाची नेटवर्थ ८० कोटी रूपये आहे. ती वर्षाला ६ ते ७ कोटी रूपये कमावते. सामंथाकडे हैद्राबादच्या जुबली हिल्समध्ये एक शानदार बंदला आहे. इतकंच नाही तर तिच्याकडे लक्झरी कार्सचं कलेक्शनही आहे. सामंथाकडे बीएमडब्ल्यू 3 सीरीज, बीएमडब्ल्यू एक्स5 आणि जगुआर एक्सएफआर सारख्या कार्स आहेत. सामंथा लवकरच विजय सेतुपति आणि नयनताराच्या 'काथुवाकुला रेंदु काधल' (Kaathuvaakula Rendu Kaadhal) सिनेमात दिसणार आहे.