"Ex वहिनीच्या कपड्यांबद्दल सलमानला आक्षेप", 'दबंग'च्या दिग्दर्शकाचा मोठा खुलासा, म्हणाला- "तो कट्टर मुस्लीम..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 14:04 IST2025-09-09T14:03:00+5:302025-09-09T14:04:35+5:30
'मुन्नी बदनाम हुई' गाण्यासाठी सलमानने मलायकाच्या निवडीवर आक्षेप घेतला होता. सलमानची विचारसरणी कशी आहे, याबद्दल दबंगच्या दिग्दर्शकाने खुलासा केला

"Ex वहिनीच्या कपड्यांबद्दल सलमानला आक्षेप", 'दबंग'च्या दिग्दर्शकाचा मोठा खुलासा, म्हणाला- "तो कट्टर मुस्लीम..."
'दबंग' सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमात सलमान खान, अरबाज खान हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. या सिनेमात मलायका अरोराने 'मुन्नी बदनाम हुई' या गाण्यावर डान्स केला. मलायकावर चित्रित झालेलं हे गाणं चांगलंच गाजलं. आजही 'मुन्नी बदनाम हुई' गाण्याची खूप चर्चा होते. परंतु हे गाणं शूट करण्याआधी एक्स वहिनीच्या अर्थात मलायकाच्या कपड्यांबद्दल सलमानने नाराजी दर्शवली होती. काय घडलं होतं नेमकं, याचा किस्सा दबंगचे दिग्दर्शक अभिनव कश्यप यांनी सांगितला आहे.
सलमान - अरबाजने केलेला मलायकाला विरोध
अभिनव कश्यपने सांगितले की, "सलमान खान आणि अरबाज खान हे दोघेही मलायका अरोराला 'आयटम गर्ल' म्हटलं जातं, त्यामुळे नाराज होते. अरबाजला हे आवडले नव्हते की त्याची पत्नी 'आयटम गर्ल' म्हणून ओळखली जाईल. सलमान आणि अरबाज दोघेही अत्यंत पुराणमतवादी कट्टर मुस्लीम आहेत. त्यामुळे मलायकाच्या कपड्यांवरुनही सलमानसोबत दिग्दर्शकाचे मतभेद झाले होते. त्यांना त्यांच्या घरातील स्त्रियांनी पारंपरिक कपडे घालावे असे वाटते, म्हणून मलायकाने हे आयटम साँग करावे, याच्या ते विरोधात होते."
मलाइकाचा निर्णय
अभिनव यांनी पुढे सांगितले. ते म्हणाले, "मलाइका एक खूप स्वतंत्र आणि कणखर महिला आहे. तिचे निर्णय ती स्वतः घेते. जेव्हा तिला हे गाणे ऑफर केले गेले, तेव्हा तिने लगेच होकार दिला. पण अरबाजला यासाठी तयार करणे खूप कठीण होते. तेव्हा मलायकाने अरबाजला समजावून सांगितले की, गाण्यात काहीही अश्लील नाही, तो फक्त एक डान्स आहे आणि पूर्ण परिवार या गाण्यात आहे, त्यामुळे घाबरण्यासारखे काही नाही." त्यानंतर हे गाणं शूट झालं. या गाण्याने अनेक रेकॉर्ड तोडले. आजही हे गाणं अनेकांच्या आवडीचं आहे.