सलमान खानच्या आगामी 'बॅटल ऑफ गलवान' सिनेमाची घोषणा! भाईजान साकारणार 'या' आर्मी ऑफिसरची भूमिका
By देवेंद्र जाधव | Updated: July 5, 2025 09:16 IST2025-07-05T09:16:20+5:302025-07-05T09:16:51+5:30
सलमान खानच्या आगामी सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं आहे. सलमान या सिनेमात एका आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे

सलमान खानच्या आगामी 'बॅटल ऑफ गलवान' सिनेमाची घोषणा! भाईजान साकारणार 'या' आर्मी ऑफिसरची भूमिका
अभिनेता सलमान खानचे गेल्या काही वर्षांतले चित्रपट फ्लॉप झाले. सलमानचा काहीच महिन्यांपूर्वी रिलीज झालेला 'सिकंदर' सिनेमा सुद्धा बॉक्स ऑफिसवर आपटला. आता सलमान त्याच्या आगामी चित्रपटात अनेक वर्षांनी आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. सलमान लवकरच एका देशभक्तीपर चित्रपटात झळकणार असून, या चित्रपटाचे नाव ‘बॅटल ऑफ गालवान’ असे आहे. या चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित झाला आहे. सलमानचा लूक सर्वांचं लक्ष वेधून घेतोय.
‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटाविषयी
चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये सलमान सैनिकी गणवेशात गंभीर आणि दमदार चेहऱ्याने दिसतो. त्यांच्या चेहऱ्यावर रक्ताचे डाग आहेत आणि पार्श्वभूमीवर लडाखमधील बर्फाच्छादित डोंगररांगा दिसतात. पोस्टरवर लिहिले आहे, “समुद्रसपाटीपासून १५,००० फूट उंचीवर भारताने एकही गोळी न चालवता सर्वात कठीण लढाई लढली.”
‘बैटल ऑफ गालवान’ हा चित्रपट १५ जून २०२० रोजी लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षावर आधारित आहे. या झटापटीत भारतीय लष्कराचे अनेक जवान शहीद झाले होते. सलमान खान या चित्रपटात कर्नल बी. संतोष बाबू यांची भूमिका साकारणार आहेत. कर्नल संतोष बाबू यांनी या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावली होती.
चित्रपटाचे दिग्दर्शन अपूर्वा लाखिया करत असून, याचं शूटिंग जुलै २०२५ पासून लडाखमध्ये सुरू होणार आहे. चित्रपटात सलमानसोबत चित्रांगदा सिंग, अंकुर भाटिया, हर्षिल शाह हे कलाकारही झळकणार आहेत. चित्रपटाला संगीत दिग्दर्शन हिमेश रेशमियाचे आहे. ‘बैटल ऑफ गलवान’ हा चित्रपट हिंदीसह तमिळ, तेलगू आणि कन्नड भाषांमध्येही प्रदर्शित होणार असून, २०२५ मध्ये तो थिएटरमध्ये रिलीज होईल. सलमानच्या या नव्या रूपात त्याचे चाहते खूश असून, सोशल मीडियावर त्यांच्या लूकची मोठी चर्चा सुरू आहे.