"पाकिस्तान आणि बलुचिस्तानमधील लोक इथे..."; सलमान खानच्या वक्तव्याची चर्चा, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 12:43 IST2025-10-20T12:42:27+5:302025-10-20T12:43:31+5:30
सलमान खानने नुकत्याच एका कार्यक्रमात पाकिस्तान आणि बलुचिस्तानबद्दल एक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी सलमानला चांगलंच ट्रोल केलंय. काय म्हणाला भाईजान?

"पाकिस्तान आणि बलुचिस्तानमधील लोक इथे..."; सलमान खानच्या वक्तव्याची चर्चा, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) नेहमीच त्याच्या चित्रपटांमुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो, पण यावेळी तो एका वक्तव्यामुळे वादात सापडला आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात त्याने काही देशांचा उल्लेख केला. पण त्याने चुकीचा संदर्भ आणि माहिती दिल्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलंय आणि नाराजी व्यक्त केलंय.
काय आहे नेमकं प्रकरण?
सौदी अरेबियातील रियाद येथे जॉय फोरम २०२५ या कार्यक्रमात बॉलिवूडचे तिन्ही खान सहभागी होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना सलमान खानने सांगितलं की, ''सध्या असा काळ आहे की, जर तुम्ही एखादा हिंदी सिनेमा बनवला आणि तो सौदी अरेबियात रिलीज केला तर हा सिनेमा सुपरहिट होईल. जर तुम्ही एखादा तामिळ, तेलुगू किंवा मल्याळी सिनेमा इथे रिलीज केला तर तो १०० कोटींचा व्यवसाय करेल. कारण इतर देशांमधून अनेक लोक इथे राहायला आले आहेत. इथे बलुचिस्तानमधील लोक आहेत, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील लोक आहेत. सर्वजण इथे काम करत आहेत.''
I don’t know if it was slip of tongue, but this is amazing! Salman Khan separates “people of Balochistan” from “people of Pakistan” .
— Smita Prakash (@smitaprakash) October 19, 2025
pic.twitter.com/dFNKOBKoEz
या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर सलमानवर टीका करण्यात आली आहे. बलुचिस्तान हा पाकिस्तानचाच एक भाग आहे, तो वेगळा देश नाही, हे माहीत असतानाही सलमान खानने त्याचा उल्लेख एका स्वतंत्र देशाप्रमाणे केला. त्यामुळे नेटकऱ्यांनी सलमानला चांगलंच ट्रोल केलं आहे.
अनेकांनी गंमतीने म्हटलं की, "सलमान खानने त्याच्या विधानात एकाच फटक्यात बलुचिस्तानला पाकिस्तानपासून वेगळं करून टाकलं!" काही युजर्सनी त्याला भूगोल शिकण्याचा सल्ला दिला. तर काहींनी सलमान नकळतपणे हे विधान बोलून गेला, म्हणत त्याची बाजू घेतली आहे. सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो सध्या 'बिग बॉस १९'चं सूत्रसंचालन करतोय शिवाय 'बॅटल ऑफ गलवान' सिनमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.