सलमानचं लग्न का होत नाही? सलीम खान यांनी दिलेलं सविस्तर उत्तर, म्हणाले, "काम सोडून तिने गृहिणी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 13:28 IST2025-01-09T13:28:15+5:302025-01-09T13:28:38+5:30

त्याचं नातं लग्नापर्यंत का पोहचत नाही यावर सलीम खान काय म्हणाले वाचा.

Salim khan once revealed why salman khan not getting married says he has contradictory thinking | सलमानचं लग्न का होत नाही? सलीम खान यांनी दिलेलं सविस्तर उत्तर, म्हणाले, "काम सोडून तिने गृहिणी..."

सलमानचं लग्न का होत नाही? सलीम खान यांनी दिलेलं सविस्तर उत्तर, म्हणाले, "काम सोडून तिने गृहिणी..."

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान (Salman Khan) अजूनही अविवाहितच आहे याची नेहमीच चर्चा होत असते. सलमान आता ५९ वर्षांचा झाला असून आता त्याच्या लग्नाची शक्यता तशी कमीच दिसत आहे. काही वर्षांपूर्वी सलमानचे वडील, ज्येष्ठ लेखक सलीम खान (Salim Khan)  यांनी यावर भाष्य केलं होतं. सलमान खानचंलग्न का होत नाही याचं त्यांनी उत्तर दिलं होतं. सलमान ज्या मुलींवर प्रेम करतो त्यांच्यात तो त्याच्या आईला शोधतो. त्याचं नातं लग्नापर्यंत का पोहचत नाही यावर सलीम खान काय म्हणाले वाचा.

काही वर्षांपूर्वी पत्रकार कोमल नाहटा यांना दिलेल्या मुलाखतीत सलीम खान म्हणाले, "सलमानच्या विचारांमध्ये थोडा विरोधाभास आहे. सलमान ज्यांच्यासोबत काम करतो ते दिसायला चांगले असतात. त्यांच्यात ओळख होते आणि त्यामुळे आपसूकच प्रेम होतं. ९० टक्के वेळा तर ती सिनेमाची हिरोईनच असते. त्यांच्यात प्रेम होतं. ते एकमेकांना कमिटमेंट देतात. पण सिनेमाची अभिनेत्री म्हटलं की ती करिअरलाही गांभीर्याने घेणारी असते. तिचंही ध्येय असतं."

ते पुढे म्हणाले,  " सलमान जिच्यावर प्रेम करतो तिला बदलायचा प्रयत्न करतो कारण तो तिच्यात आईला शोधतो. म्हणजे आईसारखंच तिनेही काम सोडून घर सांभाळावं असं त्याला वाटतं. हे तर आजच्या जगात शक्य नाही. ती मुलांना शाळेत सोडेल, ब्रेकफास्ट बनवेल, संध्याकाळी मुलांचा होमवर्क घेईल अशी गृहिणी ती असेलच असं नाही. सलमान जिच्यावर प्रेम करतो त्यांच्याकडून याच अपेक्षा ठेवतो ज्या अशक्य आहेत. त्यांनी प्रयत्न केला तरी हे शक्य नाही. म्हणूनच त्याचं नातं लग्नापर्यंत पोहोचत नाही."

Posts from the bollyblindsngossip
community on Reddit

सुरुवातीला सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचं रिलेशनशिप खूप चर्चेत होतं. मात्र नंतर त्यांचं ब्रेकअप झालं. यानंतर काही वर्षांनी सलमानचं अभिनेत्री संगीता बिजलानीसोबत लग्न होणार होतं. त्यांच्या लग्नाच्या पत्रिकाही छापल्या गेल्या होत्या. मात्र हेही नातं तुटलं. सलमान आणि सोमी अलीच्या अफेअरचीही चर्चा होती. तर गेल्या काही वर्षात कतरिना कैफ आणि आता युलिया वंतूरसोबत त्याचं नाव जोडलं जात आहे.

Web Title: Salim khan once revealed why salman khan not getting married says he has contradictory thinking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.