सैयारा फेम अहान पांडेने खाल्ला विंचू, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 13:19 IST2025-08-05T13:18:35+5:302025-08-05T13:19:01+5:30
अहान पांडे सध्या एका जुन्या थ्रोबॅक व्हिडिओमुळे चांगलाच चर्चेत आहे.

सैयारा फेम अहान पांडेने खाल्ला विंचू, व्हिडीओ व्हायरल
Ahaan Panday Eats Scorpion: अहान पांडे (Ahaan Pandey) स्टारर सैयारा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनवलेला हा चित्रपट १८ जुलै २०२५ ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. सैयाराने जगभरात ४०० कोटींपेक्षा अधिक कलेक्शन केले आहे. अहान पांडेनं अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचं आणि समीक्षकांचं मन जिंकलं. 'सैयारा' चित्रपटातून रातोरात लोकप्रिय झालेला अभिनेता अहान पांडे सध्या एका जुन्या थ्रोबॅक व्हिडिओमुळे चांगलाच चर्चेत आहे.
अहान पांडेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो परदेशातील लोकल स्ट्रीट फूड स्टॉलवर विंचू खाताना दिसत आहे. संकोच करत तो विंचू खातान दिसला. विशेष म्हणजे, विंचू खाल्ल्यानंतर त्यानं "पिझ्झा खाल्ल्यासारखं वाटतंय!" अशी प्रतिक्रिया दिली. त्याच्या या व्हिडीओनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय.
अहान पांडे हा अभिनेता चंकी पांडेचा पुतण्या आणि अनन्या पांडेचा चुलत भाऊ आहे. अभिनेता होण्यासाठी तो गेल्या दहा वर्षंपासून यासाठी मेहनत घेत होता. अभिनयाबरोबरच त्यानं फाइन आर्ट्स, सिनेमॅटिक आर्ट्स तसंच फिल्म आणि टेलिव्हिजन प्रोडक्शनचं शिक्षण घेतलं. तो २०१६ मध्ये आलेल्या 'रॉकऑन २' आणि 'फ्रिकी अली' चित्रपटांचा सहायक दिग्दर्शक होता. यानंतर 'सैयारा' चे निर्माते आदित्य चोप्रा यांनीही त्याला राणी मुखर्जीच्या 'मर्दानी २' आणि 'द रेल्वे मॅन' या प्रकल्पांत सहायक म्हणून काम करण्याची संधी दिली. त्यानंतरच दिग्दर्शक मोहित सुरी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यानं 'सैयारा'तून दमदार पदार्पण केलं.