'सायना' बायोपिकसाठी परिणीती नव्हे,'ही' अभिनेत्री होती पहिली चॉईस; सायना नेहवालचा खुलासा, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 11:22 IST2026-02-19T11:19:49+5:302026-02-19T11:22:53+5:30
परिणीती नाही 'सायना' बायोपिकसाठी 'या' अभिनेत्रीला मिळालेली पहिली ऑफर! का दिला नकार?

'सायना' बायोपिकसाठी परिणीती नव्हे,'ही' अभिनेत्री होती पहिली चॉईस; सायना नेहवालचा खुलासा, म्हणाली...
Saina Nehwal On Her Biopic: भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या (Saina Nehwal) जीवनावर आधारित 'सायना' हा बायोपिक २०२१ मध्ये प्रदर्शित झाला. बॅडमिंटन क्षेत्रात सायनाची कामगिरी, आतापर्यंत तिच्या वाट्याला आलेले यशापयशाचे क्षण, या प्रवासात तिच्या पालकांपासून ते अगदी प्रशिक्षकापर्यंतची भूमिका या सर्वच गोष्टींवर चित्रपटाच्या माध्यमातून भाष्य करण्यात आलं. या सिनेमात अभिनेत्री परिणीती चोप्राने (Parineeti Chopra) सायना नेहवालची भूमिका साकारली होती. मात्र, या चित्रपटाला फारसं यश मिळालं नाही. त्यात आता या चित्रपटातील कास्टिंगबद्दल खुद्द फुलराणी म्हणजे सायनाने मोठा खुलासा केला आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
अलिकडेच सायना नेहवालने 'विकी लालवानी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती म्हणाली, आजही जर पुन्हा माझ्यावर बायोपिक बनवण्यात आला तर श्रद्धा कपूर ही माझी पहिली पसंत असेल.त्यासोबतच सायनाने परिणीती चोप्रासोबतच्या तिच्या नात्याबद्दलही सांगितले. परिणीतीने सायनाला इंस्टाग्रामवर अनफॉलो केल्याच्या सोशल मीडियावरील चर्चेवर स्पष्टपणे उत्तर दिलं.
बायोपिकसाठी श्रद्धा कपूर होती पहिली पसंत...
सायना नेहवाल म्हणाली आहे की जरी तिच्या बायोपिकचा रिमेक झाला तरी ती पडद्यावर तिची भूमिका करण्यासाठी अभिनेत्री श्रद्धा कपूरची निवड करेल. रिपोर्ट्सनुसार, २०२१ च्या चित्रपटात परिणीतीने सायनाची भूमिका साकारली होती. सायना नेहवालने सुरुवातीला या भूमिकेसाठी श्रद्धाची निवड केली होती.मात्र, काही कारणामुळे श्रद्धा या प्रोजेक्टचा भाग होऊ शकली नाही.
यावेळी सायना म्हणाली, "आम्ही अजूनही संपर्कात आहोत आणि मी तिला अनेक वेळा भेटलो आहे. ती खूप गोड मुलगी आहे. त्यावेळी तिने चित्रपट करायला होकार दिला, पण डेंग्यूमुळे तिला हा प्रोजेक्ट सोडावा लागला."