भूषण प्रधानच्या अभिनेत्रीसोबत आता सैफ अली खानचा रोमान्स, 'जादू' गाणं पाहिलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 10:13 IST2025-04-10T10:12:07+5:302025-04-10T10:13:04+5:30

या सिनेमात जयदीप अहलावत, कुणाल कपूरही मुख्य भूमिकेत आहेत. जयदीप अहलावतच्या डान्स मूव्ह्ज पाहून चाहेत चकित झालेत.

Saif Ali Khan romance with actress nikita dutta in next jwel theif movie song jaadu out | भूषण प्रधानच्या अभिनेत्रीसोबत आता सैफ अली खानचा रोमान्स, 'जादू' गाणं पाहिलंत का?

भूषण प्रधानच्या अभिनेत्रीसोबत आता सैफ अली खानचा रोमान्स, 'जादू' गाणं पाहिलंत का?

सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि जयदीप अहलावत (Jaydeep Ahlawat) यांचा सिनेमा 'ज्वेल थीफ' (Jwel Thief) लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये सैफ लुटारुच्या भूमिकेत आहे. कूकी गुलाटी आणि रॉबी ग्रेवाल यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. पहिल्यांदाच सैफ आणि जयदीप अहलावत एकत्र दिसणार असल्याने चाहते सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान सिनेमात अशी अभिनेत्री आहे जिने नुकताच मराठीत सुपरहिट सिनेमा दिला आहे. कोण आहे ती?

'ज्वेल थीफ' सिनेमाचा फर्स्ट लूक फेब्रुवारीच आला होता. तर आता  सिनेमातलं 'जादू' हे गाणं नुकतंच आऊट करण्यात आलं आहे. युट्यूबवर गाणं रिलीज झालं आहे. यामध्ये सैफ अली खान, कुणाल कपूर, जयदीप अहलावत आहे. तर अभिनेत्री निकिता दत्तानेही (Nikita Dutta) गाण्यातून लक्ष वेधून घेतलंय. निकिता यामध्ये सैफसोबत रोमान्स करताना दिसत आहे. निकिताने नुकतंच 'घरत गणपती' मराठी सिनेमात काम केलं होतं. यामध्ये ती भूषण प्रधानसोबत झळकली. हा सिनेमा सुपरहिट झाला होता. आता ती थेट सैफ अली खानसोबत रोमान्स करताना दिसत आहे. तर जयदीप अहलावतच्या डान्स मूव्ह्जने चाहते चकित झाले आहेत.

या गाण्यावर चाहत्यांनी जयदीप अहलावतसाठीच जास्त कमेंट्स केल्या आहेत. कारण सगळेच जयदीपला पहिल्यांदाच डान्स करताना पाहत आहे. जयदीपचा डान्स साधासुधा नाही तर त्याने स्टेजवर आग लावली आहेच. त्याला या लूकमध्ये पाहून चाहते खूश झालेत.

राघव चैतन्यने 'जादू सा मेरा हुनर' हे गाणं गायलं आहे. ९० च्या दशकाची आठवण देणारं असं हे गाणं आणि गाण्यातील डान्स स्टेप्स आहेत. सैफ आणि निकिता दत्ताची केमिस्ट्री जबरदस्त आहे. तर कुणाल कपूरने त्याच्या चार्मिंग लूकने पुन्हा प्रेमात पाडलंय. २५ एप्रिल रोजी 'ज्वेल थीफ' नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

Web Title: Saif Ali Khan romance with actress nikita dutta in next jwel theif movie song jaadu out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.