Saif Ali Khan : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या शहजादला कसं पकडलं? CCTV फुटेजमधून मिळाला पुरावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 10:09 IST2025-01-20T10:08:45+5:302025-01-20T10:09:27+5:30
Saif Ali Khan : अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यातील आरोपीला आता पोलिसांनी अटक केली आहे.

Saif Ali Khan : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या शहजादला कसं पकडलं? CCTV फुटेजमधून मिळाला पुरावा
अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यातील आरोपीला आता पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असं आरोपीचं नाव आहे. ३० वर्षीय आरोपीने सैफवर सहा वेळा चाकूने वार केले होते. त्यामुळे तो अजूनही रुग्णालयात दाखल आहे. आरोपी शहजादला ५ दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे.
या हायप्रोफाइल प्रकरणाची उकल करण्यासाठी पोलिसांनी दिवसरात्र काम केलं. याच दरम्यान, पोलिसांना कोणत्या प्रकारचा पुरावा मिळाला ज्यामुळे आरोपींना पकडण्यास मदत झाली हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सैफवर हल्ला करणाऱ्या शहजादला कशी अटक केली ते जाणून घेऊया...
पोलिसांनी शहजादला कसं पकडलं?
पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळालं जो वांद्रे रेल्वे स्टेशनचं आहे. त्या दिवशी हल्लेखोर बाईकवर दिसला. पोलिसांनी चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर करून आरोपीची ओळख पटवली. बाईकच्या नंबरप्लेटवरून बाईकस्वाराला पकडण्यात आलं. याच व्यक्तीच्या माध्यमातून पोलीस हल्लेखोरापर्यंत पोहोचले आणि त्याला अटक करण्यात आली.
१६ जानेवारीच्या रात्री सैफवर हल्ला केल्यानंतर आरोपी जवळच्या बागेत लपून बसल्याची माहिती समोर आली. पुढचे ३-४ तास तिथेच राहिला. मग एका दुकानात गेला आणि कपडे बदलले. सकाळी ८.३६ वाजता वांद्रे स्टेशनवरून दादरला जाणारी ट्रेन पकडली. पोलिसांना वांद्रे स्टेशनवरून पहिली माहिती मिळाली. दादरला गेल्यानंतर तो गायब झाला.
चेहऱ्याची ओळख पटवण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर करून, पोलिसांनी गेल्या काही दिवसांत वांद्रे रेल्वे स्थानकावरून गेलेल्या सर्व लोकांचे चेहरे जुळवण्याचा प्रयत्न केला. त्यादरम्यान पोलिसांना एक मोठा पुरावा मिळाला. शहजादला बाईकवर जाताना दिसला होता. पोलीस त्या बाईकपर्यंत पोहोचले आणि शहजादला अटक करतात. आरोपीनेही आपला गुन्हा कबूल केला.
आरोपीने सांगितलं की, त्याला माहीत नव्हतं की, तो सैफच्या घरी चोरी करणार आहे. त्याचा हेतू चोरीचा होता म्हणून त्याने काही शस्त्रं सोबत नेली होती. मी घरात प्रवेश केला तेव्हा खोलीत तीन महिला होत्या. सैफ नंतर आला. त्याने स्वतःचं रक्षण करण्यासाठी चाकू दाखवला. नंतर झटापटीदरम्यान, सैफवर चाकूने सहा वार केले. हल्ल्यानंतर त्याला समजलं की, त्याने एका सेलिब्रिटीवर हल्ला केला आहे.