"सर्वात देखणा हिरो, खरे ही-मॅन...", सचिन पिळगावकरांनी धर्मेंद्र यांना वाहिली श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 16:19 IST2025-11-24T16:18:48+5:302025-11-24T16:19:35+5:30
सचिन पिळगावकर यांनी धर्मेंद्र यांच्यासोबतचा जुना फोटो शेअर करत लिहिले...

"सर्वात देखणा हिरो, खरे ही-मॅन...", सचिन पिळगावकरांनी धर्मेंद्र यांना वाहिली श्रद्धांजली
बॉलिवूडचे हँडसम अभिनेते धर्मेंद्र यांचं आज निधन झालं. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण सिनेसृष्टी शोकसागरात बुडाली आहे. विले पार्ले येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. अमिताभ बच्चन, शबाना आजमी, संजय दत्त, सलमान खान, रणवीर सिंह-दीपिका पादुकोण असे अनेक सेलिब्रिटी स्मशानभूमीत अंत्यदर्शनासाठी आले होते. मराठी अभिनेते सचिन पिळगावकर यांनी धर्मेंद्र यांच्यासाठी भावुक पोस्ट लिहिली आहे.
सचिन पिळगावकर यांनी धर्मेंद्र यांच्यासोबतचा जुना फोटो शेअर करत लिहिले, "सर्वात देखणे धरम जी, दिग्गज व्यक्ती आपल्याला सोडून गेली आहे पण त्यांचा वारसा कायम राहील. त्यांच्याबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली यासाठी मी कायमच कृतज्ञ राहीन. खरा ही-मॅन कायम सर्वांच्या स्मरणात राहील. ॐ शांति"
धर्मेंद्र यांच्या 'शोले' सिनेमात सचिन पिळगावकर होते. याआधी १९६७ साली त्यांनी धर्मेंद्र यांच्या 'मझली दीदी' या सिनेमात बालकलाकार म्हणून काम केले होते. यामध्ये मीना कुमारी मुख्य अभिनेत्री होत्या.
धर्मेंद्र यांचा 'इक्कीस' हा शेवटचा सिनेमा महिनाभरात रिलीज होणार आहे. यामध्ये अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा मुख्य भूमिकेत आहे. आज धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्काराला अमिताभ बच्चन देखील स्मशानभूमीत पोहोचले होते. साश्रूनयनांनी त्यांनी लाडक्या 'वीरु'ला अखेरचा निरोप दिला.