Jr NTR: “-तर मी सिनेमे साईन करणंच बंद करेल...”, ज्युनिअर एनटीआर हे काय बोलून गेला...!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 14:17 IST2023-03-20T14:17:31+5:302023-03-20T14:17:42+5:30
RRR Actor Jr NTR : साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर याचे जगभर असंख्य चाहते आहेत. चाहते त्याच्या नव्या सिनेमाची आतुरतेने प्रतीक्षा करत असतात. पण अचानक ज्युनिअर एनटीआर असं काही बोलून गेला की त्याचे चाहते लगेच टेन्शनमध्ये आले...

Jr NTR: “-तर मी सिनेमे साईन करणंच बंद करेल...”, ज्युनिअर एनटीआर हे काय बोलून गेला...!!
आरआरआर सिनेमानंतर लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरचे (Jr NTR) जगभर असंख्य चाहते आहेत. चाहते त्याच्या नव्या सिनेमाची आतुरतेने प्रतीक्षा करत असतात. पण अचानक ज्युनिअर एनटीआर असं काही बोलून गेला की त्याचे चाहते लगेच टेन्शनमध्ये आले. -तर मी यापुढे कोणताही चित्रपट साइन करणार नाही, असं ज्युनिअर एनटीआर म्हणाला. त्याच्या या जाहिर वक्तव्यानं सगळेच हैराण झालेत. आता तो असं का म्हणाला, तर ते जाणून घेऊ यात.
तुम्हाला ठाऊक आहेच की, ज्युनिअर एनटीआर सध्या एनटीआर ३० या सिनेमामुळे चर्चेत आहे. कोरताला शिवाच्या या सिनेमाबद्दल प्रत्येक लहानसहान गोष्ट जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. पण ज्युनिअर एनटीआर मात्र यामुळे जाम वैतागला आहे. इतका की, लोक असंच विचारत राहिले तर मी सिनेमे साईन करणंच बंद करेल, असं वैतागून त्याने म्हटलं. अद्याप मी कोणताही सिनेमा साईन केला नसल्याचंही त्याने यावेळी स्पष्ट केलं.
ज्युनिअर एनटीआर सिनेमेच साईन करणं बंद करणार, हे ऐकून चाहत्यांचं टेन्शन वाढलं नसेल तर नवल. चाहते टेन्शनमध्ये आलेत. तोपर्यंत ज्युनिअर एनटीआरला देखीत आपल्या चुकीची जाणीव झाली. आपलं विधान आपल्याच अंगलट येऊ शकतं, याची जाणीव होताच त्याने लगेच घूमजाव केलं. मी मस्करी करत होतो, सिनेमात काम करणं बंद करण्याचा माझा कुठलाही इरादा नसल्याचं तो म्हणाला.
'ज्युनियर ३०' या सिनेमाबद्दल सांगायचं तर बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर या चित्रपटाद्वारे तेलुगुमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार आहे. ज्युनियर एनटीआरच्या 'RRR' मधील 'नाटू नाटू' गाण्याने नुकताच ऑस्कर जिंकला आहे. या चित्रपटात ज्युनियर एनटीआरसोबत रामचरणही मुख्य भूमिकेत आहे.