Rowdy Rathore 2 : काय सांगता? अक्षय कुमारने हातचा गमावला 'राऊडी राठौर 2'? या अभिनेत्याच्या नावाची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 17:39 IST2023-04-12T17:37:59+5:302023-04-12T17:39:11+5:30
Rowdy Rathore 2 : बॉलिवूड इंडस्ट्रीत सध्या सीक्वलची हवा आहे. ब्रह्मास्त्रचा दुसरा पार्ट येतोय. वाॅर या सिनेमाच्या सीक्वलचीही घोषणा झालीये. आता आणखी एका अशाच गाजलेल्या सिनेमाच्या सीक्वलची चर्चा जोरात आहे. होय, या सिनेमाचं नाव आहे 'राऊडी राठौर'...

Rowdy Rathore 2 : काय सांगता? अक्षय कुमारने हातचा गमावला 'राऊडी राठौर 2'? या अभिनेत्याच्या नावाची चर्चा
बॉलिवूड इंडस्ट्रीत सध्या सीक्वलची हवा आहे. ब्रह्मास्त्रचा दुसरा पार्ट येतोय. वाॅर या सिनेमाच्या सीक्वलचीही घोषणा झालीये. आता आणखी एका अशाच गाजलेल्या सिनेमाच्या सीक्वलची चर्चा जोरात आहे. होय, या सिनेमाचं नाव आहे 'राऊडी राठौर'. होय, अक्षय कुमार व सोनाक्षी सिन्हाच्या तुफान गाजलेल्या या सिनेमाचा सेकंड पार्ट येणार असल्याची खबर आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, शबीना खान दीर्घकाळापासून 'राऊडी राठौर 2' (Rowdy Rathore 2 ) बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. आता या सिनेमाबद्दल एक नवी अपडेट आहे. 'पिंकविला'ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, चित्रपट निर्माती शबीना खान यांनी 'राऊडी राठौर 2' या चित्रपटाची कल्पना लॉक केली आहे. या चित्रपटासाठी सिद्धार्थ मल्होत्राला घेण्याचा विचार सुरू आहे. येत्या दोन महिन्यांत या सिनेमाचं शूटींग सुरू करण्याचाही त्यांचा प्लान आहे.
सिनेमात अक्षय कुमार असेल की नाही, याबद्दल माहित नाही. कदाचित तो असेल किंवा नसेलही. तूर्तास फक्त सिद्धार्थ मल्होत्राचं नाव फायनल असल्याचं कळतंय. आता पुढे काय होतं, ते बघूच. अक्षय कुमार बद्दल बोलायचं झालं तर गेल्या काही महिन्यांत आलेले अक्षयचे सिनेमे फ्लॉप गेलेत. त्याचे सलग पाच चित्रपट दणकून आपटलेत. अशात 'राऊडी राठौर 2'मधूनही त्याचा पत्ता कट होतो की काय, हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे.
2012 मध्ये 'राऊडी राठौर' हा चित्रपट आला होता आणि त्यात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता. अक्षयने यात डबल रोल साकारला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.