Video : रोहित शेट्टीने पूर्ण केलं वचन; यूट्यूबर मित्राला भेटण्यासाठी पोहोचला उल्हासनगरमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 19:24 IST2021-11-08T19:22:30+5:302021-11-08T19:24:32+5:30
Rohit shetty: प्रसिद्ध युट्यूबर आशिष चंचलानी याला भेटण्याचं रोहितने वचन दिलं होतं. हेच वचन रोहितने पूर्ण केलं आहे.

Video : रोहित शेट्टीने पूर्ण केलं वचन; यूट्यूबर मित्राला भेटण्यासाठी पोहोचला उल्हासनगरमध्ये
अॅक्शन सीन्ससाठी विशेष लोकप्रिय असलेला दिग्दर्शक म्हणजे रोहित शेट्टी(rohit shetty). आजवरच्या कारकिर्दीत रोहितने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. 'सिंघम', 'सिंघम रिटर्न', 'गोलमाल' असे अनेक हिट चित्रपट दिल्यानंतर नुकताच रोहितचा 'सूर्यवंशी' (sooryavanshi) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यामुळे सध्या रोहित चर्चेत आहे. परंतु, या चित्रपटाप्रमाणेच रोहित अन्य एका कारणामुळेही चर्चेत येत आहे. एका युट्यूबर मित्राला भेटण्यासाठी रोहित थेट उल्हासनगरमध्ये पोहोचल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे रोहितने दिलेलं त्याचं वचन पूर्ण केल्यामुळे त्याची चर्चा रंगली आहे.
प्रसिद्ध युट्यूबर आशिष चंचलानी (ashish chanchlani) याला भेटण्याचं रोहितने वचन दिलं होतं. हेच वचन रोहितने पूर्ण केलं आहे. आशिषने रोहितचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. विशेष म्हणजे रोहित खास त्याला भेटण्यासाठी उल्हासनगरमध्ये आल्याचं पाहून तो आश्चर्यचकित झाला आहे. रोहित शेट्टी निळ्या रंगाची गाडी घेऊन आशिष चंचलानीला भेटण्यासाठी उल्हासनगरमध्ये आला होता.
‘खोलीमध्ये बसून व्हिडीओ तयार करणे ते उल्हासनगरमध्ये रोहित शेट्टी सरांना आणणे हा प्रवास माझ्यासाठी फार आव्हानात्मक होता. आज माझ्या कुटुंबीयांना प्रचंड आनंद झाला आहे’, असं कॅप्शन आशिषने या व्हिडीओला दिलं आहे.
पुढे तो म्हणतो, ‘धन्यवाद रोहित शेट्टी तुम्ही तुमचे वचन पूर्ण केले. तुम्ही जे उत्तम काम केलं आहे त्यासाठी तुम्ही कोणत्याही चित्रपटगृहामध्ये जाऊ शकत होतात. पण तुम्ही आमचे चित्रपटगृह निवडले. तुम्ही नेहमी दिलेला शब्द पाळता आणि त्यामुळेच चाहत्यांचे तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे.’ दरम्यान, आशिष चंचलानी हा अतिशय लोकप्रिय यूट्यूबर आहे. त्याचे जवळपास २६.८ मिलियन सब स्क्रायबर आहेत. तसेच इन्स्टाग्रामवर त्याचे १२ मिलियन फॉलोअर्स आहेत. अनेक कलाकार त्याला फॉलो करताना दिसतात.